आपल्या सौंदर्य आणि मादक अदांच्या जोरावर एकेकाळी चित्रपटसृष्टी दणाणून सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा 'सेक्स सिम्बॉल' अशी ओळख त्यांनी मिळवली. आज त्याच झीनत अमान यांचा वाढदिवस. 'हरे कृष्णा हरे राम', 'सत्यम शिवम सुंदरम यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या झीनत अमान यांनी लॉस एंजलिसमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कलाविश्वात नशीब आजमावण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब त्यांनी त्यांच्या नावे कोरला आहे. झीनत अमान यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८५ मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्याशी दुसरे लग्न केले. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. करिअर यशोशिखरावर असताना खासगी आयुष्यात मात्र तिला अनेक चढ उतार पाहावे लागले. ७० च्या दशकात झीनत यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मासिकाच्या मुखपृष्ठावर त्या झळकत होत्या. संजय खानबरोबरचे प्रेमप्रकरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे झीनत अमान चर्चेत राहिल्या -
चित्रपटाच्या सेटवरील झीनत अमान यांचा फोटो

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”