-
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. आज त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. ते अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आज एका जाहिरातीसाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या या अभिनेत्यांच्या करिअरच्या सुरुवातीला ते किती कमाई करत होते हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. पण सुरुवातीला ते कोलकातामधील एका कंपनीमध्ये काम करत होते. तेव्हा त्यांना ५०० रुपये पगार मिळत होता असे म्हटले जात आहे.
-
शाहरुखची सर्वात पहिली कमाई ५० रुपये होती. ती त्याला पंकज उधास यांच्या शोमध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी मिळाली होती.
-
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची सर्वात पहिली कमाई ११, ८०० रुपये होती अशा चर्चा रंगल्या आहेत.
-
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी अॅनिमेशनचे काम करत होता. त्याची पहिली कमाई ३५००० रुपये होती.
-
मल्याळम सुपस्टार मोहनलाल यांचा पहिला चित्रपट 'मंजिल वरिंजा पूक्कल' हा आहे. या चित्रपटासाठी त्यांना २ हजार रुपये मानधन मिळाल्याचे म्हटले जाते.
-
तमिळ अभिनेते कमल हासन आज तगडं मानधन घेतात. त्यांना पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी ५०० रुपये मानधन मिळाले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
तमिळ सुपरस्टार अजीत कुमार हे वयाच्या २० वर्षांपासून चित्रपटात काम करत आहेत. त्यांना पहिल्या चित्रपटासाठी २५०० रुपये मिळाले असल्याचे म्हटले जाते.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने करिअरची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यावेळी तिला ३ हजार रुपये पगार मिळत असल्याचे म्हटले जाते.
-
कन्नड सुपरस्टार सूर्याची पहिली कमाई ७४० रुपये होती अशा चर्चा रंगल्या आहेत. आज सूर्या चित्रपटांसाठी कोट्यावधी रुपये मानधन घेत आहे.

Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया