सध्याच्या काळात पाहायला गेलं तर सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सचीच चर्चा अधिक रंगत असते. यात साधारणपणे बॉलिवूडमधील काही ठराविक स्टारकिड्स सगळ्यांनाच माहित आहेत. मात्र, मराठी कलाविश्वातही असे अनेक फेमस स्टारकिड्स आहेत जे सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. ( सौजन्य : सर्व फोटो मराठी कलाकारांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन) जिजा कोठारे – लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे व उर्मिला कोठारे यांची लेक जिजा कोठारे ही सध्याच्या घडीला लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. आदिनाथ व उर्मिला अनेकदा जिजाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. विशेष म्हणजे तिचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो. जिजाला कुटुंबाकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. आई-वडिलांप्रमाणेच जिजाचे आजोबा म्हणजेच महेश कोठारे हे कलाविश्वातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. अलिकडेच लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत महेश कोठारे यांनी जिजा आणि त्यांच्यात मैत्रीचं नातं आहे असं सांगितलं. यावरुनच त्यांची जिजासोबतची असलेली बॉण्डींग दिसून येते. मायरा जोशी – अभिनेता स्वप्नील जोशी याला दोन मुलं असून त्याची मोठी मुलगी मायरा ही कायमच चर्चेत असते. स्वप्नील अनेकदा मायरासोबत मस्ती करताना किंवा तिच्याविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. विशेष म्हणजे या बाप-लेकीचं नात खास असून स्वप्नीलचं त्याच्या मुलीवर जीवापाड प्रेम असल्याचं अनेक फोटोमधून दिसून येतं. केशा केळकर – मराठी कलाविश्वातील लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक नाव म्हणजे केशा केळकर. अभिनेता शरद केळकरची लेक केशा ही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. शरद केळकर हे नाव आज कोणालाही नवीन नाही. मराठीप्रमाणेच हिंदीमध्येदेखील शरद केळकरने त्याच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.त्यामुळे तो कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. यात त्याच्यासोबत त्याच्या मुलीचीदेखील कायम चर्चा रंगत असते. अन्वी विचारे – मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेता अंशुमन विचारे. सध्या सोशल मीडियावर अंशुमनच्या मुलीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या बोबड्या बोलामुळे अंशुमनची मुलगी अन्वी सगळ्यांचं मन जिंकून घेत आहे. -
मराठी कलाकार आणि त्यांची मुलं

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”