-
स्मिता तांबे म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री. मालिका असो वा चित्रपट स्मिता तांबेने नेहमीच आपल्या अभिनयाने त्या भूमिकेवर छाप उमटवली आहे. (सर्व फोटो सौजन्य – स्मिता तांबे)
-
स्मिता तांबेचा जन्म महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये झाले. ती पुण्यात लहानाची मोठी झाली. पुढे मराठी चित्रपट सृष्टीत करिअर करण्यासाठी म्हणून मुंबईत आली. मराठी लोकसाहित्यामध्येही ती पीएचडी करत आहे.
-
स्मिता तांबेने स्वत:ला फक्त मराठीपुरता मर्यादीत ठेवले नाही तिने हिंदीमध्ये सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला.
-
सिंघम रिर्टन्स, रुख, नूर, डबल गेम या हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केले.
-
सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्याशिवाय माय नेम इज शीला या दोन वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे.
-
२००९ साली आलेल्या जोगावा या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. त्यानंतर २०१३ साली अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या ७२ मैल एक प्रवास या चित्रपटात तिने रंगवलेली राधाक्का आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
मराठी मालिका असो वा चित्रपट, मैत्रिण, नायिका, आई कुठलाही रोल असो, स्मिता तांब आपल्या भूमिकेची प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडतेच.
-
आता ती 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत स्मिता तांबे डॅशिंग मम्मीच्या भूमिकेत आहे. काळजी घेणारी सौरभची आई ते आपल्या नजरेच्या आणि शब्दाच्या धाकाने गुन्हेगारी विश्व संभाळणारी महिला असा रोल तिने केला आहे.
-
स्मिता तांबे निर्माती सुद्धा आहे. रिंगिंग रेन हे तिचे प्रोडक्शन हाऊस आहे. मागच्याच वर्षी तिने आपल्या प्रोडक्शन हाऊसतंर्गत सावट या चित्रपटाती निर्मिती केली. यात तिने एसीपी आदिती देशपांडेची भूमिका साकारली होती.
-
मागच्यावर्षी १८ जानेवारी रोजी मुंबईमध्ये स्मिता अभिनेता विरेंद्र द्विवेदीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली. महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं आहे.

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा