-
मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी सईचा बेळगावमध्ये तीर्थदीप रॉय या तरुणासोबत साखरपुडा सोहळा पार पडला.
-
सध्या सईच्या घरात लग्नसराईची धामधुम सुरु असून, लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी सई सध्या केळवणींचा आनंद घेते आहे. (फोटो सौजन्य – सई लोकूर इन्स्टाग्राम)
-
मराठमोळ्या संस्कृती लग्नाआधी होणाऱ्या केळवणींना महत्व असतं. लग्नाआधी नातेवाईक वधु किंवा वराला आपल्या घरी बोलावून त्याच्या आवडीनिवडीचे पदार्थ खायला घालतात.
-
गेल्या काही दिवसांपासून सई केळवणीचा आनंद लुटण्यात बिझी आहे, या निमीत्ताने आपलं एक खास फोटोशूट तिने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.
-
छोटंसं नक्षीकाम असलेली साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊझ आणि मोजके दागिने यामध्ये सईचं सौंदर्य खुलून आलं आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सईच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलरेट पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
लग्नाआधी आपल्या मैत्रिणींसोबत मजा करतानाचे सर्व फोटो सईने इन्स्टावर पोस्ट केले होते.
-
साखरपुडा सोहळा पार पडल्यानंतर सई आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
तिच्या या फोटोशूटलाही चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे.
-
काय मग कसा वाटला तुम्हाला सईचा हा अंदाज??

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?