-
अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर ही वेब सीरिज प्रचंड गाजली. सीरिजबरोबरच यातील पात्र आणि त्यांचे संवादही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले. याच सीरिजमधील एक पात्र म्हणजे 'ये भी ठिक है' म्हणणारा रॉबिन अर्थात अभिनेता प्रियांशू पेनयुली! (Photo : PR handout)
-
प्रियांशू सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याचं लग्न. प्रियांशू आपल्या मैत्रिणीसोबत लगीनगाठ बांधली आहे.
-
अभिनेत्री वंदना जोशीसोबत प्रियांशूने २६ नोव्हेंबरला लग्न केलं. मागील दोन वर्षांपासून प्रियांशू आणि वंदना रिलेशनशिपमध्ये होते.
-
दोघांनीही करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नियमांचं पालन करत कमी लोकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले.
-
लग्नानंतर प्रियांशूनं एक व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर केला आहे. "माझ्या सुंदर पत्नीला घेऊन जात आहे. आम्ही सोबतच एक सुंदर सुरूवात करत आहोत," असं त्यानं म्हटलं आहे.
-
प्रियांशूच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लग्नातील क्षण कैद करण्यात आलेले आहेत.
-
प्रियांशू व वंदनाचे हे फोटो लाईकही केले जात आहे. दोघानींही पिंक आणि गोल्डन कलरचे कपडे परिधान केलेले आहेत.
-
लग्नात वंदनानं लेहंगा परिधान केलेला होता, तर प्रियांशूने शेरवानी घातलेली होती.
-
वंदनानेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मेहंदीच्या समारंभाचा फोटो पोस्ट केला होता. "आणि सुरू झाली आहे, मेहंदीची रात्र" असं तिनं म्हटलं होतं.
-
एका वृत्तानुसार प्रियांशू आणि वंदनाच्या लग्नात दोन्हीकडील प्रत्येकी २५ पाहुणेच सहभागी झाले होते.
-
करोनामुळे मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
-
प्रियांशूनं वर्षाच्या सुरूवातीलाच लग्नाविषयी माहिती दिली होती. आपण लग्न करण्याचा विचार करतोय, असं तो म्हणाला होता. मात्र, करोनामुळे त्यांचं लग्न लांबणीवर गेलं होतं.
-
लग्न सोहळ्यादरम्यानं दोघेही वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसून आले.
-
वंदना ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून उत्तम नृत्यांगना आहे. यापूर्वी तिने लघुपटांमध्ये काम केलं आहे. दिल से दिया वचन’, ‘सपनों के भवर में’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
प्रियांशूने मिर्झापूर व्यतिरिक्त हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच लवकरच तो रश्मी रॉकेटमध्येही झळकणार आहे.

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा