-
अनलॉकच्या माध्यमातून राज्य सरकारने सिनेमा आणि नाट्यगृह सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतर आता हळुहळु व्यवसायिक नाटकं रंगमंचावर परतण्याची तयारी करत आहेत.
-
पुण्याच्या बालगंधर्व थिएटरवर रविवारपासून तिकीटविक्रीला सुरुवात झाली आहे. यावेळी लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांनी हजेरी लावली होती. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
१२ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तर १३ तारखेला बालगंधर्व नाट्यगृहात प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
प्रशांत दामले यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यगृहात तिकीटविक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
-
प्रदीर्घ काळानंतर राज्यातली सिनेमागृह आणि थिएटर सुरु होणार आहेत…त्यामुळे रसिकप्रेक्षकांनी पुन्हा एकदा पहिल्यासारखी नाटकांना उपस्थिती लावावी यासाठी दोन्ही कलाकारांनी प्रार्थना केली.
-
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी आल्यानंतर तिकीट काढण्यासाठी उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही त्यांना भेटण्याची संधी साधून घेतली.
-
आजही मराठी नाट्यरसिक प्रशांत दामले आणि कविता लाड या जोडीवर फिदा आहे. या दोघांना एकत्रित काम करताना पाहण्यासाठी लोकं काही वर्षांपूर्वी प्रचंड गर्दी करायची.
-
लहानग्या चाहत्याला तिकीट देताना प्रशांत दामले आणि कविता लाड
-
तिकीटविक्रीसाठी आलं आणि ग्रीन रुममध्ये जाऊन स्वतःला न्याहाळलं नाही तर मग ते कलाकार कसले?? प्रशांत दामले आणि कविता लाड यांना आजही तो मोह आवरला नाही.
-
आजही मराठी नाट्यरसिक प्रशांत दामले आणि कविता लाड या जोडीवर फिदा आहे. या दोघांना एकत्रित काम करताना पाहण्यासाठी लोकं काही वर्षांपूर्वी प्रचंड गर्दी करायची.
-
कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती आता हळुहळु नियंत्रणात आलेली असताना नाट्यव्यवसाय पुन्हा एकदा उभारी घेईल अशी सर्व कलाकारांना आशा आहे.
-
त्यामुळे कलाकार तर सज्ज झालेत तुमचं मनोरंजन करायला, तुम्ही जाणार ना नाटक पहायला??

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात