-
धर्मेश येलांडे हे नाव आज संपूर्ण देशाला परिचीत आहे. धर्मेश येलांडेपेक्षाही धर्मेश सर या नावाने त्याला अधिक ओळखलं जातं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
डान्स इंडिया डान्सपासून धर्मेश हे नाव घराघरात पोहोचलं आणि तिथूनच सुरु झाला धर्मेशच्या यशाचा प्रवास.
-
धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.
-
धर्मेशने एक दोन नाही तर तब्बल १८ वर्ष डान्सर म्हणून काम केलं त्यानंतर कुठे आता त्याला यशाची चव चाखण्यास मिळत आहे.
-
धर्मेश गुजरातमधील एका सामान्य कुटुंबातील आहे.
-
धर्मेशने डान्स करणं त्याच्या आईला अजिबात आवडत नव्हतं. यामुळे त्या नेहमी त्याला अभ्य़ास करण्यास सांगायच्या.
-
पण धर्मेश लपून डान्सच्या क्लासला जात आहे. यामुळे अनेकदा त्याला त्याच्या आईकडूनही मार खावा लागला.
-
पण त्याच्या वडिलांचा पाठिंबा होता.
-
आईपासून लपवून ते अनेकदा धर्मेशला पैसे देत असत आणि डान्स क्लासला पाठवत असत.
-
धर्मेशच्या वडिलांचा टी-स्टॉल होता. त्याच्याच बाजूला धर्मेशला मिसळ पावचा स्टॉल सुरु करुन दिला होता.
-
त्यामुळे धर्मेशने काही काळ मिसळ पाव विकण्याचं कामही केलं होतं.
-
स्टॉल सुरु करण्याआधी धर्मेशने शिपाई म्हणूनही काम केलं आहे.
-
धर्मेशला डान्स क्लासला जायचं असायचं, पण ते लोक रात्री ९ च्या आधी सोडत नसल्याने धर्मेशने ती नोकरी सोडून दिली.
-
जर मी सहा वाजता मोकळा झालो तर मी पैसे कमावून आणेन असंही धर्मेशने कुटुंबाला सांगितलं होतं.
-
टी-स्टॉलवर काम करत असल्याने स्टोव्ह पेटवताना अनेकदा धर्मेशच्या वडिलांचा हात भाजत असे. ते पाहिल्यानंतर धर्मेशला खूप वाईट वाटायचं.
-
आपण डान्स किंवा कपड्यांसाठी पैसे मागायचो तेव्हा वडील नाही म्हणायचे नाहीत. पण ते पैसे देण्यासाठी हात पुढे करत तेव्हा भाजलेला हात दिसत असे असं धर्मेश सांगतो.
-
यानंतर धर्मेशने डान्सकडे लक्ष वळवलं आणि काही मुलांना शिकवण्यासही सुरुवात केली.
-
डान्स इंडिया डान्समध्ये मिळालेल्या संधीचं धर्मेशने सोनं केलं आणि त्याला इंडस्ट्रीचा दरवाजा खुला केला.
-
डान्स इंडिया डान्समधील अनेक स्पर्धेक हे धर्मेशचे विद्यार्थी होते.
-
यामुळेच तिथे त्याला धर्मेश सर अशी ओळख मिळाली आणि त्याच नावाने ओळखलं जावू लागलं.
-
एक स्पर्धेक म्हणून आलेला धर्मेश आता डान्स प्लस शोमध्ये जज म्हणून काम करतोय.
-
धर्मेशला रेमो डिसुजाने आपल्या ABCD आणि इतर चित्रपटांमध्येही संधी दिली आहे.
-
याशिवाय धर्मेशला फराह खानसोबत काम करण्याचीही संधी मिळाली.
-
धर्मेश मुंबईत आल्यानंतर त्याची राहण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
-
यावेळी रेमोने त्याची काळजी घेतली. धर्मेश म्हणतो, जेव्हा कधी आई विचारते की मुंबईत जेवण वैगेरे इतर गोष्टींची काळजी कसा घेतोस तेव्हा रेमो सर असताना काळजी करायची गरज नाही असं सांगतो.
-
रेमो आपल्यासाठी वडिलांप्रमाणे असल्याचं धर्मेश सांगतो.
-
धर्मेशससाठी रेमो, गीता आणि १८ वर्ष त्याला डान्स शिकवणारे रवी हे गुरु आहेत. तो नेहमी त्यांच्याबद्दल भरभरुन बोलत असतो.
-
धर्मेशने गुजराती चित्रपटातही काम केलं आहे.
-
याशिवाय मराठी डान्स शोमध्येही जज आहे.
-
रेमोला आदर्श मानून मुंबईत आलेला धर्मेश आज त्याच्यात शोमध्ये जज म्हणून बसला असून संघर्ष आणि यशाचं उदाहरण देत आहे.

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी