-
शाहरुख, अक्षय, आमिर आणि सलमान या बॉलिवूड स्टार्सच्या खासगी जीवनाबद्दल प्रेक्षकांना बऱ्यापैकी माहिती आहे. या अभिनेत्यांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय माध्यमांमध्ये चर्चेत असतात. पण देओल कुटुंबातील सनी देओल यांच्या खासगी जीवनाबद्दल फार कमी जणांना माहिती असेल.
-
धर्मेंद्र यांचा मुलगा ही सनी देओलची सुरुवातीचा ओळख होती. पण नंतर त्याने स्वत:च्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली.
-
सनी देओलचा एक चाहता वर्ग आहे. पण बॉलिवूडचा अन्य स्टार्सप्रमाणे सनी देओलच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे.
-
सनी देओलचे लग्न कोणाबरोबर झाले ?, त्याची पत्नी काय करते ? या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.
-
८०-९० चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
-
सनी देओल राजकारणात चांगलाच सक्रीय असल्याचं दिसून येतं. पंजाबमधून तो आता खासदार आहे.
-
सनी देओल मुंबईतील जुहू येथे राहतो. तो आई, पत्नी पूजा आणि दोन मुलांसोबत येथे राहतो.
-
सनी देओल पत्नी पूजा बरोबर फार दिसत नाही. पूजा देओलही प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असते. हेमा मालिनी यांचा सावत्र मुलगा असलेल्या सनी देओलने गुपचूपपणे पूजा बरोबर विवाह केला होता.
-
पूजा आणि सनी देओलच १९८४ साली लग्न पण लोकांना त्याबद्दल १९९० नंतर समजले.
-
१९९० साली पूजाच्या पोटी मोठा मुलगा करण देओलचा जन्म झाला. त्यानंतर माध्यमांमध्ये पूजा देओल हे नाव चर्चेत आले.
-
पूजा पेशाने लेखिका आहे. सनी देओलच्या 'यमला पगला दीवाना'चा स्क्रिनप्ले तिनेच लिहिला होता. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
लग्नाआधी पूजा देओलचे नाव लिंडा होते. ती मूळची ब्रिटनची नागरिक आहे. पूजा देओलचे वडिल भारतीय होते तर आई ब्रिटिश नागरिक होती.
-
प्रसारमाध्यमांनुसार, लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष पूजा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये फारशी आनंदी नव्हती. सनी देओलच्या अफेअर्सच्या चर्चा हे त्यामागे कारण होते. जनसत्ताने हे वृत्त दिले आहे.
-
सनी देओलचे नाव डिंपल कपाडिया, अमृता सिंह या अभिनेत्रींबरोबर जोडले जायचे.
-
आता मात्र सनी आणि पूजा वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. मोठया मुलाचे नाव करण तर छोटया मुलाचे नाव राजवीर आहे.

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख