-
विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणारे अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव देशातील प्रतिभावान कलाकारांमध्ये घेतलं जातं. मागील चार दशकांपासून नाना पाटेकर चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. मराठीच नव्हे बॉलिवूडमध्येही नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता/Social Media)
-
अभिनयाबरोबरच नाना पाटेकर यांची वेगळी ओळख म्हणजे त्यांची साधी राहणी.
-
चार दशकांपासून चित्रपटसृष्टीत असलेले नाना पाटेकर करोडो रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. पण तरीही नानांचं जगणं सर्वसामान्य माणसासारखंच आहे.
-
Celebrityearnings.com साईटने माहितीनुसार नाना पाटेकर यांच्याजवळ जवळपास ४० कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकर एका सिनेमासाठी १ कोटी रुपये घेतात. नानांकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.
-
नाना पाटेकर यांनी पुण्याच्याजवळ खडकवासला येथे फार्महाऊस खरेदी केलेलं आहे. हे फार्महाऊस २५ एकर परिसरात आहे.
-
नाना पाटेकर आपला बहुतांश वेळ या फार्महाउसवरच राहतात.
-
फार्महाउसमध्ये ७ खोल्या असून, एक मोठा हॉलही आहे.
-
फार्महाउसमधील इंटेरिअर नाना पाटेकर यांनी साध्या पद्धतीने केलेलं आहे.
-
फार्महाउस परिसरात असलेल्या रिकाम्या जागेवर नाना पाटेकर शेती करतात. हा शेतमाल विकून नाना मिळालेला पैसा काम करणाऱ्या मजुरांना देतात.
-
नाना पाटेकर सामाजिक कार्यात मदतीसाठी पुढे आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धीर देण्यासाठी नाम नावाची संस्थेत नाना पाटेकर यांचं मोठं योगदान आहे. (संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता/Social Media)

Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”