-
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या वहिनीसाहेबांनी अर्थात धनश्रीने तिच्या बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले आहेत. मालिकेत नंदिता गायकवाड ही भूमिका साकारणारी धनश्री सध्या सर्वत्र वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. कुटुंबीयांनी आणि मित्र-मैत्रिणींनी मिळून बेबी शॉवरसाठी ही सजावट केली. यावेळी धनश्रीने गाऊन परिधान केला होता. -
धनश्रीने याआधीही डोहाळे जेवणाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
धनश्रीने यापूर्वी ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्येही काम केले आहे. सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, धनश्री काडगावकर

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”