-
मुंबईत मागच्या आठवड्यात एका पॉर्न चित्रपटांच्या रॅकेटचा पदार्फाश झाला. (सर्व फोटो सौजन्य – गहना वशिष्ठ)
-
या प्रकरणात अभिनेत्री-मॉडेल गहना वशिष्ठला शनिवारी अटक करण्यात आली.
-
पॉर्न व्हिडिओ शूट करुन ते स्वत:च्या वेबसाइटवर अपलोड करत असल्याचा गहनावर आरोप आहे.
-
सत्र न्यायलयाने गहनाला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
हिंदी आणि तेलगु चित्रपटांशिवाय गहना वशिष्ठने अनेक जाहीरातींमध्ये सुद्धा काम केले आहे. गहनावर झालेले आरोप तिच्या टीमने फेटाळून लावले आहेत.
-
"गहना नवोदीत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना हेरायची. या कलाकरांना आमिष दाखवून त्यांच्याकडून आपल्या पॉर्न चित्रपटात काम करुन घ्यायची."
-
"या नवोदीत कलाकारांना एका पॉर्न चित्रपटात काम करण्याचे १५ ते २० हजार रुपये मिळायचे" अशी माहिती या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने दिली. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.
-
"तिने ८७ पॉर्न व्हिडिओ शूट करुन आपल्या वेबसाइटवर अपलोड केले होते. हे व्हिडिओ पाहण्यासाठी दोन हजार रुपये सबस्क्रिप्शन फी होती" असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
-
तिच्या तीन बँक खात्यांमध्ये ३६ लाख रुपये असून, सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून तिने ही कमाई केली आहे.
-
"गहना वशिष्ठ उर्फ वंदना तिवारी पूर्णपणे निर्दोष आहे. ती कुठल्याही पॉर्न फिल्मच्या रॅकेटमध्ये सहभागी नाही."
-
"तिला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तिला बदनाम करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे" असे गहनाच्या लीगल टीमकडून सांगण्यात आले आहे.
-
मिस आशिया बिकिनी पुरस्कार जिंकलेली गहना एक मॉडेल व अभिनेत्री आहे.
-
एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे. इतरही अडल्ट वेब सीरीजमध्ये ती झळकली आहे.
-
पोलिसांनी छापा मारला, त्यावेळी घटनास्थळावरून एचडी व्हिडीओ कॅमेरा, सहा मोबाईल, एक लॅपटॉप आणि व्हिडीओ असलेलं मेमरी कार्ड जप्त केलं होतं.
-
पोलिसांनी शुक्रवारी मालाड-मालवणी परिसरातील मढमध्ये असलेल्या ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी पोलिसांनी दोन अभिनेत्यांसह एक लाईटमॅन, एक महिला फोटोग्राफर आणि एका ग्राफिक डिझायनरला अटक केली होती.

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…