-
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही जोडी नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असते.
-
सखी आणि सुव्रत यांच्या लग्नाला जरी दोन वर्षे झाली असली तरी गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकत्र आहेत.
-
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त सखीने सुव्रतसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.
-
'कायदेशीर पद्धतीने बांधलेल्या लग्नगाठीला दोन वर्षे आणि सहवासाची सहा वर्षे', असं लिहित सखीने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट ही 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या सेटवर झाली.
-
११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.
-
सध्या हे दोघं लंडनमध्ये राहत आहेत.
-
लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत 'आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकेत एकत्र झळकले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सखी गोखले / इन्स्टाग्राम)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”