-
अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं.
-
मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते.
-
मंजिरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
मंजिरीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये मंजिरीचा दुहेरी खण नऊवारी साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.
-
मंजिरीने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या दुहेरी खण साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
मंजिरीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. ऋतुजा बागवे, आदिनाथ कोठारे, प्रसाद ओक यांनी कमेंटमध्ये काही इमोजी पोस्ट केले आहेत.
-
मंजिरीचा आणखी एक खास अंदाज.
-
मंजिरीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंजिरी ओक / इन्स्टाग्राम)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…