-
'महाराष्ट्राज मोस्ट डिझायरेबल वुमन २०२०'ची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. पाहुयात या यादीत कोणी बाजी मारली आहे… (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
२०२० मधील महाराष्ट्राची सर्वांत आकर्षक महिला ठरली आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान. छोट्या पडद्यावरील 'होणार सून मी या घरची' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. या मालिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली. झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-२’, ‘तू तिथे असावे’ चित्रपटांमध्ये झळकलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटील या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
-
'शिकारी' आणि झी ५ वरील 'काळे धंदे' या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खान या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेत्री मीरा जगन्नाथ चौथ्या स्थानावर आहे.
-
अभिनेत्री नयना मुके पाचव्या क्रमांकावर आहे.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील सहाव्या क्रमांकावर आहे.
-
या यादीत सातव्या स्थानावर आहे अभिनेत्री तन्वी मुंडेल.
-
अभिनेत्री पूजा बिरारी आठव्या क्रमांकावर आहे.
-
‘माझा होशील ना’ मालिकेत सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे नवव्या क्रमांकावर आहे.
-
अभिनेत्री रुपाली भोसले दहाव्या क्रमांकावर आहे. रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
'लागीरं झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूर्वा शिंदे अकराव्या स्थानावर आहे.
-
अभिनेत्री इशा केसकर बाराव्या स्थानी आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतून इशाने छोट्या पडद्यावरील तिच्या करिअरला सुरुवात केली.
-
अभिनेत्री पूर्णिमा डे तेराव्या स्थानावर आहे.
-
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले चौदाव्या स्थानावर आहे.
-
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. अभिनेत्री गायत्री दातार पंधराव्या क्रमांकावर आहे.

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…