-
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. (फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम)
-
टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. (फोटो सौजन्य : यूट्यूब)
-
अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात गंगूबाईंची भूमिका साकारणार आहे. (फोटो सौजन्य : यूट्यूब)
लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं काही शूटिंग राहिलं होते. अनलॉकनंतर या चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली. ते आता पूर्ण झाले असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. याबाबत अभिनेत्री आलिया भट्टने स्वतः ही माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम) हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिलं, “८ डिसेंबर २०१९ रोजी आम्ही चित्रपटाचं शूटिंग सुरु केले आणि आता २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाने दोन लॉकडाउन, दोन चक्रीवादळ आणि बऱ्याच समस्यांचा सामना केला आहे. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही.” (फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम) गंगूबाई काठियावाडी हे पात्रं संजय लीली भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. (फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम) -
गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं. (फोटो सौजन्य : यूट्यूब)
अलिकडेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला. (फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम) -
येत्या ३० जुलैला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : यूट्यूब)
-
(फोटो सौजन्य : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा