-
प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'Color फूल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण आणि मीरा अशी या पात्रांची नावं असून या दोघांची ही कथा आहे. 'कलरफुल'च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असून या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.
-
'पाँडिचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवनवीन प्रयोग करण्यात दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांचा हातखंडा राहिला आहे. अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी आणि नीना कुळकर्णी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
'मीडियम स्पाइसी' हा नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर यांच्याशिवाय सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, या युवा कलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसणार आहेत.
-
'मिमी' या चित्रपटात सई ताम्हणकर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. 'मिमी' हा चित्रपट 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
-
प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा 'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मधूर भांडारकर हे नेहमी सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करत असतात. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिका साकारत आहे.

‘काकूबाई, जरा थांबा…’, भररस्त्यात ‘ही नवरी असली’ गाण्यावर महिलेचा तुफानी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक