-
अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही चांद्यापासून बांद्यापर्यंत 'आपल्या' म्हणून ओळखल्या जातात.
-
'माहेरची साडी' या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करुन त्यांच्या मनात एक खास जागा मिळविलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल-आठल्ये.
-
सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली.
-
कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात जरी त्यांचा हातखंडा असला तरी एके काळी त्यांनी निर्माती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मराठी चित्रपट सर्वदूर पोहोचवला.
-
अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न केलं.
-
समीर आठल्ये हे सिनेमॅटोग्राफर आहेत.
-
या दोघांना दोन मुली आहेत. कस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.
-
मुलं आपल्या आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवतात असं अनेकदा म्हटलं जातं. त्यातही कलाकारांची मुलं त्यांच्याप्रमाणेच कलाकार बनतात याला इतिहास साक्षी आहे. पण इतिहास बदलण्याची ताकदही काहींमध्ये असतेच.
-
अलका यांची थोरली मुलगी इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे.
-
ईशानीने २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवलं होतं. पण तिला भारतात यायचं होतं म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आणि अखेर भारतातही लायसन्स मिळवलं.
-
इशानी लवकरच दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न करणार आहे. त्यापूर्वी या दोघांचा रोका समारंभ झाला.
-
विशेष म्हणजे इशानी ज्या निशांतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तो मुळचा दिल्लीचा असून तोदेखील मियामीमध्येच स्थायिक आहे.
-
अद्याप केवळ यांचा रोका पार पडला आहे. मात्र ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हे स्पष्ट झालेलं नाही.
-
अलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करतेय तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अलका कुबल-आठल्ये / इन्स्टाग्राम)

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव