-
कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेने पहिल्या भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळताना दिसत आहे.
-
अभिनेत्री शुभांगी गोखले, शिवानी सोनार, मनीराज पवार, श्रुती अत्रे, गार्गी फुले या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.
-
अभिनेत्री श्रुती अत्रे या मालिकेत राजश्री ढाले पाटील ही भूमिका साकारत आहे.
-
श्रुती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
श्रुतीचा जन्म साताऱ्यात झाला.
-
पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून श्रुतीने पदवी शिक्षण पूर्ण केले.
-
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने श्रुती अभिनय क्षेत्राकडे वळाली.
-
अभिनेत्री असण्यासोबतच श्रुती उत्तम नृत्यांगना आहे.
-
नाटकापासून श्रुतीने करिअरला सुरुवात केली.
-
श्रुतीच्या पतीचे नाव आश्विन दिवेकर आहे.
-
आश्विन दिवेकर कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.
-
'बन मस्का' आणि 'बापमाणूस' या मालिकांमध्येही श्रुतीने काम केलं आहे.
-
श्रुतीची लहान बहिणसुद्धा सुंदर आहे. योगीता अत्रे असं तिचं नाव आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती अत्रे /इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक