-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
अभिज्ञा भावे ही ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली आहे. अभिज्ञा ही सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच अभिज्ञाने काही हटके फोटोशूट केले आहेत. -
याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
यातील एका फोटोत तिने गोल्डन रंगाची नेटची साडी परिधान केली आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत अभिज्ञा छान सूट बूट घालून दिसत आहे.
-
तर नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमध्ये तिने लाल रंगाचा लेदर स्कर्ट परिधान केला आहे.
-
या तिन्ही फोटोत ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.
-
उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या ‘तेजाज्ञा’ या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे.
-
‘तेजाज्ञा’ हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडितने मिळून लाँच केला आहे. (सर्व फोटो – अभिज्ञा भावे/ इन्स्टाग्राम)

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या कानशिलात लगावणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं