-
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड….सर्वांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे वाद. काही वाद सेलिब्रेटींच्या आयुष्यातून काही काळानंतर निघून जातात, पण काही वाद हे नेहमीच सेलिब्रिटीच्या नावाला चिकटून राहतात. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स जी सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे, तिच्याभोवती एक वाद अद्यापही घोंघावत आहे.
-
सात वर्ष जुना हा वाद आजही तिच्या आठवणीत ताजा आहे. जेनिफरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या या भीतीबद्दल बोलून दाखवलं.
-
काही वर्षांपूर्वी हॅकर्सने जेनिफर लॉरेन्सचे न्यूड फोटो लीक केले होते.
-
२०१४ मधील या स्कँडलमध्ये जेनिफरसोबत रिहाना आणि सेलेना गोमेज यांच्यासारखे मोठे सेलिब्रेटीज सहभागी होते, ज्यांचेही फोटो लीक झाले होते.
-
जेनिफरने व्हॅनिटी फेयर या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी भाष्य केलं आहे. “त्यावेळी कोणीही मला माझ्या कपड्यांशिवाय पाहू शकत होतं, माझ्या परवानगीशिवाय…दिवसात कधीही. फ्रान्सच्या कोणत्या तरी व्यक्तीने हे फोटो पब्लिश केले होते, हा मानसिक धक्का मला कायम राहील”.
-
हॅकर्सने जेनिफरचं अकाऊंट हॅक केलं आणि त्यानंतर आय क्लाऊड हॅक करुन खासगी फोटो मिळवले होते.
-
यावेळी सेलेना गोमेज, रिहान यांचेही फोटो लीक झाले होते. सोबतच अॅरियाना, व्हिक्टोरिया जस्टिस, केप अपटन यांचंही अकाऊंट हॅकर्सने हॅक केलं होतं.
-
या स्कँडलनंतर अभिनेत्रीने सांगितलं होतं की, “मी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे याचा अर्थ हे सर्व व्हावं अशी माझी इच्छा नव्हती. हे माझं शरीर असून माझी निवड आहे. इथे तर मी हे निवडलं नव्हतं हे सर्वात वाईट होतं”.
-
मुलाखतीत जेनिफरने २०१७ मध्ये विमानाचं इंजिन फेल झाल्याच्या घटनेने आपल्याला कमकुवत केल्याचं म्हटलं. पण यानंतरही आपल्याला विमानाने प्रवास करावा लागतो असंही तिने सांगितलं.
-
ती सांगते की, “आम्ही सर्वजण मृत्यूच्या दारात होतो. मी तर माझ्या कुटुंबीयांना वॉईसमेल्स पाठवू लागली होती. माझं आयुष्य खूप छान राहिलं, मला माफ करा असं मी सांगत होते”.
-
जेनिफर सध्या प्रेग्नंट असून लवकरच आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागताची वाट पाहत आहे.
-
जेनिफरला नुकतंच लिओनार्डोसोबत लॉस एंजेलिसमध्ये एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये पाहण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत होता.
-
(All Photos: Jennifer Lawrence Instagram)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा