-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा समावेश सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्यांमध्ये केला जातो. अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. चित्रपटांव्यतिरिक्त अक्षय कुमार त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो.
-
अक्षय कुमार हा वर्षभरात किमान चार चित्रपटात काम करतो. सध्या अक्षय कुमार हा ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
-
अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पण अक्षय कुमारला त्याच्या एकाही रेकॉर्डब्रेक चित्रपटासाठी पुरस्कार मिळत नाही. याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो.
-
अक्षय कुमारसारख्या कलाकाराला पुरस्कार सोहळ्यात एकही पुरस्कार का दिला जात नाही? असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान त्याला विचारण्यात आला होता.
-
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर यांच्या शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अक्षयला हा प्रश्न विचारला.
-
यावर अक्षय कुमारने स्वत: कारण सांगत स्पष्टीकरण दिले होते.
-
यावेळी अक्षय मस्करी करत म्हणाला, “अनेक पुरस्कार सोहळ्यावेळी त्याला सांगितले जाते की, जर तुला पुरस्कार हवा असेल तर तुला अर्ध्या पैशात हा शो करावा लागेल. मात्र अक्षय त्यांची ही अट मान्य करत नाही.”
-
“त्या उलट मला पूर्ण पैसे हवे आहेत, तुम्ही पुरस्कार दुसऱ्याला द्या,” असे अक्षय कुमारने सांगितले.
-
यावेळी अनुपम खेर म्हणाले की “तुला पुरस्कार मिळत नाही, तर तुझी काही हरकत नसते का?” असा प्रश्न अक्षयला विचारला.
-
यावर अक्षय कुमार म्हणाला की, “मला अजिबात वाईट वाटत नाही. पुरस्कारादरम्यान फेरफार होतात,” असे सांगत त्याने याबाबत धक्कादायक खुलासा केला.
-
“पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्यांना पुरस्कार दिले जातात. पण जे तिथे उपस्थित नाही, त्यांनाही ते पुरस्कार का मिळत नाही?” असा प्रश्नही अक्षयने उपस्थित केला.
-
“मी अनेकदा पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी जातो, तेव्हा त्या ठिकाणी एकाचे नाव खोडून दुसऱ्याचे नाव लिहिलेले असते,” असा खुलासाही अक्षयने यावेळी केला. अक्षय कुमारचे हे बोलणे ऐकून अनुपम खेर जोरजोरात हसायला लागले.
-
यापुढे अक्षय कुमार म्हणाला की, “माझी पत्नी ट्विंकल खन्ना ही माझ्यासाठी लकी चार्म आहे. लग्नापूर्वी माझे 14 चित्रपट फ्लॉप झाले. पण ट्विंकलशी लग्न झाल्यानंतर अक्षयचे नशीब बदलले,” अशी कबुली त्याने दिली.
“जर तुला पुरस्कार हवा असेल तर…”, अक्षय कुमारने केला ‘अॅवॉर्ड शो’बद्दल धक्कादायक खुलासा
पण अक्षय कुमारला त्याच्या एकाही रेकॉर्डब्रेक चित्रपटासाठी पुरस्कार मिळत नाही.
Web Title: Akshay kumar does not get awards for this reason the actor himself raised the secret nrp