-
सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच दिग्दर्शकांचीही चर्चा होताना दिसते.
-
सेलिब्रिटींप्रमाणेच बिग बजेट सिनेमा बनवणाऱ्या दिग्दर्शकांची संपत्ती हा देखील अनेकदा चर्चेचा विषय राहिलेला आहे.
-
श्रीमंतीच्या बाबतीत करोडपतींनाही मागे टाकणाऱ्या भारतीय दिग्दर्शकांबद्दल जाणून घेऊया.
-
करण जोहर : ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘माय नेम इज खान’ असे एकाहून एक हिट चित्रपट दिलेला बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक म्हणजे करण जोहर.
-
आलिशान आयुष्य जगणारा करण जोहर तब्बल १ हजार ५०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
-
राजकुमार हिराणी : दिग्दर्शक राजकुमार हिराणी आपल्या चित्रपटातून समाजाचं दर्शन घडवत असतात.
-
‘पीके’, ‘थ्री इडियट्स’द्वारे वेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना चित्रपटांच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या राजकुमार हिराणी यांची एकूण संपत्ती १ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे.
-
संजय लीला भन्साळी : बिग बजेट सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जाणारे बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ९४० कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
-
‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘देवदास’ असे अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहे.
-
अनुराग कश्यप : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गॅंग ऑफ वासेपूर २’, ‘देव डी’, ‘सांड की ऑंख’ हे सिनेमे खूप गाजले.
-
अनुराग कश्यपची एकूण संपत्ती ८५० कोटी रुपये इतकी आहे.
-
मेघना गुलजार : ‘राझी’, ‘छपाक’ या सिनेमांतून समाजाचा आरसा दाखवून चपराक बसवणाऱ्या दिग्दर्शिका म्हाणजे मेघना गुलजार.
-
त्यांची एकूण संपत्ती ८३० कोटी रुपये इतकी आहे.
-
कबीर खान : बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानच्या ‘न्यूयॉर्क’, ‘८३’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांच्या प्रेक्षक प्रेमात आहेत.
-
कबीर खान ३४१ कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
-
अनुराग बासू : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग बासूला कोण ओळखत नाही.
-
‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’ असे हिट बॉलिवूड चित्रपट बनवणाऱ्या अनुराग बासूची एकूण संपत्ती ३३० कोटी रुपये इतकी आहे.
-
रोहित शेट्टी : अॅक्शनपटांसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी.
-
‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘सूर्यवंशी’ चित्रपटातून अॅक्शनचा थरार मोठ्या पडद्यावर दाखवणारा रोहित २९० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
-
एस. एस. राजामौली : दाक्षिणात्य दिग्दर्शक राजामौलींचे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घालत नाहीत तर प्रेक्षकांना वेडही लावतात.
-
‘बाहुबली’, ‘आरआरआर’, ‘मख्खी’ असे सुपरहिट चित्रपट बनवणाऱ्या राजामौली यांची एकूण संपत्ती ११० कोटी रुपये इतकी आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”