-
नोरा फतेही ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच आपल्या नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.
-
सध्या नोरा फतेही कलर्स टीव्हीवरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
नुकतंच नोराने छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली.
-
यावेळी तिच्याबरोबर अभिनेता आयुष्यमान खुराना आणि जयदीप अहलावात हे देखील उपस्थित होते.
-
कार्यक्रमादरम्यान नोराने खूप धमाल-मस्ती केली. शिवाय यावेळी कपिलबरोबर अनेक चर्चाही रंगल्या.
-
दरम्यान नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने आपल्या सहकलाकाराबाबत सांगितलेला किस्सा खरंच धक्कादायक होता.
-
गप्पा रंगात आल्या असताना कपिलने नोराला एक प्रश्न विचारला. चित्रीकरणादरम्यान कधी कोणाशी तुझं भांडण झालं होतं का?
-
या प्रश्नाला उत्तर देत नोराने एक किस्सा सांगितला. तिचा हा किस्सा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.
-
नोरा म्हणाली, “बांग्लादेशमध्ये मी चित्रीकरण करत होते. तिथे चित्रीकरण करत असताना माझ्या सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केलं.”
-
“मी कोणताच विचार न करता त्याच्या कानशिलात लगावली. नंतर त्यानेही मला कानशिलात लगावली.”
-
“मग मीही त्याला पुन्हा कानाखाली मारली. त्यानंतर तो माझे केस खेचू लागला. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला या वादामध्ये हस्तक्षेप करावा लागला.”
-
नोराने सांगितलेला हा किस्सा ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक