-
उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लिंक-अप्स आणि लूकमुळे अधिक चर्चेत असते. तिने कोणताही ड्रेस परिधान केला तरी ती अप्रतिम दिसते.
-
अलीकडेच दुबईतील फिल्मफेअर मिडल ईस्ट अवॉर्ड शोमध्ये जेव्हा उर्वशीने रेड कार्पेटवर एन्ट्री केली तेव्हा तिचे सौंदर्य बघून सर्वच थक्क झाले.
-
या घट्ट गुलाबी ड्रेसमध्ये उर्वशी इतकी सुंदर दिसत होती की तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच कमी पडतील.
-
उर्वशीने यावेळी तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी गुलाबी रंगाचा मॅक्सी गाऊन निवडला. हा ड्रेस एका खास कापडापासून तयार करण्यात आला होता.
-
ड्रेसमध्ये शिमरी इफेक्ट आणण्यासाठी खास क्रिस्टल वर्क केले गेले. कॅमेऱ्याच्या प्रकाशात हे चमकणारे क्रिस्टल्स उर्वशीला ड्रीमी लूक देत होते.
-
या गाऊनमध्ये स्ट्रेटकट नेकलाइन देण्यात आली होती, तर कमरेवर कॉर्सेट फिटिंग देण्यात आली होती. यामुळे उर्वशीचे आकर्षक शरीर हायलाइट झाले.
-
तथापि, गाउनच्या तळाशी हेमलाइनला जोडलेले पंख सर्वात आकर्षक दिसत होते.
-
उर्वशीचा हा बॉडीकॉन गाऊन डिझायनर इरेना सोप्रानोच्या सोल अँजेलन या लेबलवरून घेण्यात आला होता.
-
अधिकृत वेबसाइटवर त्याची किंमत ४,५०० अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे ३,६७,४३१ रुपये इतकी आहे.
-
उर्वशी रौतेला या जबरदस्त पिंक स्ट्रॅपलेस कॉर्सेट गाउनमुळे अगदी बार्बी डॉलसारखी दिसत होती.
-
तिने कानात स्टेटमेंट इअररिंग्ज घातले होते, तर डोक्यावर मुकुट होता. या दागिन्यांमुळे ती एखादी राजकन्या भासत होती.
-
दरम्यान, सध्या सर्वत्र उर्वशीच्या या लूकची चर्चा आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा