-
बिग बॉस १६ च्या विजेत्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. टीव्हीचा सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १६चं विजेतेपद एमसी स्टॅनने पटकावलं आहे. एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला आहे.
-
प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत झाली, तथापि एमसी स्टॅन विजयी ठरला. प्रियंका चहर चौधरी किंवा शिव ठाकरे बिग बॉस सीझन १६ चे विजेतेपद जिंकू शकतील असे मानले जात होते, परंतु या निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
-
एमसी स्टॅनला सर्वाधिक तर शिव आणि प्रियांका चहर चौधरी यांना एमसी स्टॅनपेक्षा कमी मते मिळाली. प्रियांका या शोची दुसरी रनर अप होती, तर शिव ठाकरे उपविजेता ठरला.
-
या पर्वाचे यश पाहून हा कार्यक्रम १२ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला. स्टॅनच्या विजयानंनतर सर्वांना आश्चर्य वाटले. विजयाची प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या प्रियंकाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
-
यानंतर ट्रॉफीसाठी स्टॅन आणि शिवा यांच्यात शेवटची लढत झाली. हे दोघेही मित्र, कोणीही जिंकले तर आनंद होईल असे म्हणताना दिसले. यानंतर सलमानने विजेता म्हणून स्टॅनच्या नावाची घोषणा केली.
-
शालीन भानोत, शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियंका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन हे अंतिम फेरीतील टॉप-५ अंतिम स्पर्धक होते.
-
शोच्या सुरुवातीला ‘बिग बॉस सीझन 16’ ची बक्षीस रक्कम ५० लाख रुपये होती, मात्र नंतर ती २१ लाख ८० हजार रुपये करण्यात आली. मात्र कालच्या टास्कमध्ये ती ३१ लाख ८० हजार रुपये झाली.
-
यंदाच्या शोची ट्रॉफी सर्व सीझनपेक्षा वेगळी आहे. विजेता एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार मिळाले आहेत. याशिवाय त्याला ग्रॅंड आय१० निओस कारदेखील मिळाली आहे.
-
२३ वर्षीय एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. यामुळेच वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्याने कव्वाली ऐकायला सुरुवात केली.
-
यानंतर अल्ताफचे मन रॅपकडे अधिक आकर्षित होऊ लागले आणि मग हळूहळू तो रॅप करू लागला. आज स्टॅन एक रॅपर तसेच गीतकार आणि संगीतकार आहे. त्याची फॅन फॉलोइंगही करोडोंच्या घरात आहे.
-
एमसी स्टॅन पुण्याचा रहिवासी आहे. त्याने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केले आहे. एमसी स्टॅनने ‘बिग बॉस १६’ च्या प्रीमियरला ‘HINDI’ लिहिलेले ६०-७० लाख किमतीचे नेकपीस आणि ८० हजार किमतीचे शूज परिधान करून आला होता.
-
एमसी स्टॅनने ‘समझ मेरी बात को’ या गाण्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. एमसी स्टॅनने अनेक गाणी गायली असली तरी ‘वाटा’ या गाण्याने त्याला लोकप्रियता मिळाली.

धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी