-
साऊथ आणि बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदऱ्यानं अनेकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी जिनिलीया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. जिनिलीयाने काही दिवसांपुर्वी चाहत्यांशी संवाद साधला होता.
-
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील आस्क मी सेशनद्वारे चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. तेव्हा एका चाहत्याने जिनिलीयाला चक्क लग्नाची मागणी घातली होती.
-
जिनिलीयाला चाहत्याने “माझं तुझ्यावर प्रेम आहे, लग्न करशील का?” असं विचारत थेट लग्नाची मागणी घातली होती.
-
यावर जिनिलीयाने “मी विचार केला असता; पण माझं सर्वात सुंदर व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे” असं उत्तर दिलं होतं.
-
दरम्यान, रितेश-जिनिलीयाकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघे अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.
-
जिनिलीयाचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील जिनिलीयाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
याशिवाय लवकरच रितेश-जिनिलीया यांचा ‘वेड’ चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे; याबद्दल स्वत: जिनिलीयानेच खुलासा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…