-
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकावरून सध्या वाद चालू आहे. गेल्या महिन्यात पुण्यातील प्रयोगात गोंधळ घालण्यात आला, तर नुकताच कल्याणमधील प्रयोग तीव्र विरोधामुळे रद्द करावा लागला. (PC : Loksatta)
-
सावरकर दर्शन प्रतिष्ठान निर्मित या नाटकात काल्पनिक पात्र उभे करून गौतम बुद्धांना कमी लेखण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. या नाटकाच्या माध्यमातून बुद्ध तत्त्वज्ञानाचा गैरअर्थ काढून चुकीचा संदेश समाजात पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. (PC : Loksatta)
-
या नाटकातील काही पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा आरोप करत बौद्ध लेणी संवर्धन समिती, वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरवादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. (PC : VBA/X)
-
गौतम बुद्धाने शांतीचा, अहिंसेचा संदेश दिला. मात्र या नाटकात शस्त्राचा विचार काल्पनिक पात्राच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. नाटकातील अखेरच्या भागात १५ वर्षे भिक्खू राहिलेले सेनापती विक्रमसिंह अचानक शेवटी खड्ग (शस्त्र) उचलतात. युद्ध नाही केले, तर अतिक्रमण होणार हा विचार नाटकातून देण्यात आला आहे, असा आरोप बौद्ध लेणी संवर्धन समितीचे अध्यक्ष संजय कीर्तिकर यांनी केला. (PC : VBA/X)
-
भिक्खू, सैनिक यांच्या कार्यपद्धी वेगळ्या होत्या. भिक्खू दानातून आपला जीवनक्रम करत होते. पण या नाटकात त्याची सरमिसळ करण्यात आली आहे. जो कधीच नव्हता अशा विक्रमसिंह राजाचे काल्पनिक पात्र नाटकात उभे करण्यात आले आहे. एका संवादात ‘तुम्ही बुद्ध धर्म स्वीकारा म्हणजे तुम्हाला खायला, राहायला आणि भिक्षुणीही मिळतील,’ अशी आक्षेपार्ह संवाद रचना आहे. हा गौतमबुद्ध विचारांचा, आंबेडकरी जनतेचा अपमान आहे. त्यामुळे या नाटकाच्या काही भागांना आमचा ठाम विरोध आहे, असे कीर्तिकर यांनी सांगितले. (PC : @sameer_kasture/X, TIEPL)
-
आंबेडकरी समाजाचे नेते बाबा रामटेके यांनीही या नाटकावर आक्षेप घेतला आहे. ‘सावकरांनी नेहमीच वाद्ग्रस्त, विकृत लिखाण केले आहे. राष्ट्रपुरुषही त्यांच्या लेखणीतून सुटले नाहीत. ‘सन्यस्त खड्ग’ नाटकात गौतमबुद्धाच्या मूळ विचारांना तिलांजली देण्यात आली आहे. त्यांच्या मूळ विचाराचा चुकीचा अर्थ काढून काल्पनिक पात्रे, कथानक उभे करण्यात आले आहे,’ असा आरोप त्यांनी केला. (PC : @sameer_kasture/X)
-
गौतमबुद्ध क्षत्रिय राजा होता. संन्यस्त खड्गमधून बुद्धांचा चुकीचा विचार परवला जात असताना क्षत्रिय, मराठा गप्प बसले आहेत. उलट ते सावरकरांच्या विचारांची पाठराखण करत आहेत. याचे आश्चर्य वाटते. म्हणजे गौतमबुद्ध विचारांचा अपमान होत असताना मागासवर्गीय समाजाने लढत राहायचे आणि बहुजन समाजाने बघत राहायचे का? अशा नाटकांच्या संहितांची होळी केली पाहिजे, असंही बाबा रामटेके म्हणाले. (PC : @sameer_kasture/X)
-
निर्मात्यांचं म्हणणं काय?
‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाला काही संघटनांकडून तीव्र विरोध होत असताच नाटकाचे सहनिर्माते अनंत वसंत पणशीकर यांनी मात्र या नाटकाचं समर्थन केले. ‘अतिशय उत्तम बांधणीच्या या नाटकातून बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि कर्मयोगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आक्षेप, वाद नकोत म्हणून मूळ प्रतीतले काही भाग वगळून मूळ नाटकाला धक्का न लावता रंग आवृत्ती तयार करण्यात आली आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान, बुद्ध विचार आणि कर्म या सांधणीतून उत्तम संवादातून बुद्ध विचारच नाटकातून मांडण्यात येत आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा विषयच नाही. कोणालाही काही आक्षेप असेल तर त्यांनी ‘संन्यस्त खड्ग’ नाटक पाहण्यास यावे आणि समोर बसून काही आक्षेप कसे चुकीचे आहेत ते पटवून सांगावे. विरोध करण्यापेक्षा समोर बसून चर्चा करा. त्याचाही आम्ही विचार करण्यास तयार आहोत,’ असं अनंत पणशीकर म्हणाले. (PC : Loksatta) -
‘आधी आक्षेप नव्हता, आता का?’
‘संगीत सन्यस्त खड्ग’ नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ मध्ये झाला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात या नाटकाचे प्रयोग झाले, चर्चा झाली. त्यावेळी कधी डॉ. आंबेडकर आणि आंबेडकरी जनतेने या नाटकाविषयी आपला आक्षेप नोंदवला नाही. जो विचार ९६ वर्षांच्या काळात मांडण्यात आला, तोच विचार आताही या नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. अनेक वर्षांच्या काळात कधी या नाटकाला विरोध झाला नाही. या नाटकात जे काही संबंधितांना आक्षेपार्ह वाटत होते, ते शब्द, संवाद वगळण्यात आले आहेत. परीनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र नाटकाला आहे, असंही अनंत पणशीकर यांनी सांगितलं. (PC : Loksatta)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम