-
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या गावात अनेक धबधबे, डोंगरकडे, हिरवीगार झाडे, शुद्ध थंड हवा, तलाव ह्यांची रेलचेल असल्याने हे पर्यटकांचे छोट्या सहलीसाठीचे आवडते ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडारदऱ्यातच आहे.
-
कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करणारी मंडळी ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. इथून जवळच प्रवरा नदीच्या प्रवाहातून तयार होणार रंधा धबधबा आहे. भंडारदरा धरण, रंधा फॉल्स, अम्ब्रेला फॉल्स, रतनवाडी, भंडारदरा धरण, घाटघर हि ठिकाणे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी आहेत.
-
मुंबई-नाशिक महामार्गावर असलेलं इगतपुरी एकदिवसाच्या पर्यटनासाठी उत्तम पर्याय असू शकतो. इगतपुरी तालुक्याला निसर्गाचे अमाप वरदान लाभले आहे. या तालुक्यात ऐतिहासिक, धार्मिक महत्व असलेली अनेक ठिकाणे आहेत. पावसाळ्यात घाटमाथा, डोंगर-दऱ्या सर्वत्र परिसर हिरवागार होतो. कसारा घाटात पाऊस आणि धुक्याचा रंगणारा खेळ, भावली धरण परिसरातील धबधबे, वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला चौफेर प्रदेश, घाटनदेवी परिसर, दारणा, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशी अनेक ठिकाणं पाहता येतील. इगतपुरी तालुक्यालगत असलेल्या भंडारदरा, कळसूबाई, अलंग, कुरूंगवाडी, त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊ शकता. डोंगरांजवळून जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर डोंगरावरून येणारे पाणी येत असून काही ठिकाणी लहान-मोठे धबधबे तयार झाले आहेत.
-
नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात आहे. दुर्गम भागात असल्याने या ठिकाणच्या आजूबाजूला मोठे शहर नसल्याने येथे फार लोक जात नाहीत. गर्दी नसल्याने हे ठिकाण शांत व रम्य आहे. येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथांची गुहा, महाशिवरात्री दरम्यान भरणारी गोरक्षनाथांची यात्रा, सीताखाई पॉईंट व धबधबा तसेच ट्रेकिंगसाठी सीताखाई ट्रेल व खडकी ट्रेल या आहेत.
-
सातपुडा पर्वतरांगांत वसलेले चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. येथे तलाव, धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर व वन्यप्राणी बघायला मिळतात. या गावाच्या जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.
-
गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम. गगनगडावरील भवानी मंदिर सुद्धा भेट द्यावी असे आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पर्वणी असलेले मोरजाई पठारही इथून खूप जवळ आहे.
-
ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते ते लोक येथील आसपासचा जंगल परिसर बघू शकतात. येथील जंगलांत जैवविविधता बघायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी, झाडे, फुलपाखरे, प्राणी तसेच औषधी वनस्पती ह्या जंगलात आहेत.
स्ट्रॉबेरीसाठी प्रसीद्ध असलेले महाबळेश्वर म्हणजे पर्यटकांचे ऑल टाइम फेव्हरेट ठिकाण. महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय. येथून कृष्णा नदीचा उगम होतो तो आपण बघू शकता. महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. -
माथेरानचं निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. माथेरानमध्ये सहकुटुंब येणाऱ्यांसाठी रिसॉर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते.
माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाहीये. त्यामुळे दस्तुरी कार पॉईंटपर्यंत तुम्ही वाहन नेऊ शकता. तिथून मातीच्या रस्त्यावरुनच माथेरानची भ्रमंती करावी लागते. गाड्या नसल्या तरी पर्यटकांसाठी येथे घोडयांची व्यवस्था आहे. इथली शांतता आणि गर्दी वनराईच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे. येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे. हे पठार म्हणजे दक्खनच्या पठाराचाच एक विस्तारित भाग आहे. पाचगणीत बघण्यासारखे पॉईंट्स म्हणजे सिडनी पॉईंट,पारसी पॉईंट हे होत. सिडनी पॉईंटवरून धोम धरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंटवरून कृष्ण नदीचे मोठे पात्र बघता येते. लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गडकिल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात. लोणावळा-खंडाळा – लोणावळा-खंडाळा हे निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. लोणावळा व खंडाळा शहराचा निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार डोंगररांगा, त्यातून वाहणारे धबधबे, सकाळी व सायंकाळी डोंगरकपारीतील धुक्याची चादर असा हा सर्व निसर्गरम्य परिसर मनाला हवाहवासा वाटतो. -
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण. समुद्रकिनाऱ्यावरील गणपतीचे देऊळ हे इथले प्रमुख आकर्षण आहे. येथे रिसॉर्ट्स राहण्यासाठी आरामदायक आहेत तसेच इथले वातावरण थंडीच्या काळात आल्हाददायक असते.
-
इथल्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सही खेळता येतात. येथून जवळच लाईटहाऊस, आरे वारे बीच, वेळणेश्वर, जयगड किल्ला, पावस आणि केशवसुतांचे जन्मगाव मालगुंड सुद्धा बघण्यासारखे आहेत.
-
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथील मुख्य आकर्षण व्याघ्र दर्शन व जंगल सफारी आहे.
-
येथे वाघ, चित्ते, काळवीट, हरीण,नीलगाय, जंगली मांजर, सांबार, चितळ, मगर असे अनेक प्राणी व पक्षी आहेत. तसेच अनेक दुर्मिळ साप व कासवे सुद्धा आहेत. येथे विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व पक्षीही बघायला मिळतात.

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल