व्हॉट्सअॅप भारतातील प्रसिद्ध चॅटिंग अॅप आहे. राजकारण्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकजण व्हॉट्सअॅपचा वापर करत असतो. इतकंच नाही तर गुन्हेगारही सर्रासपणे व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मात्र पोलीस आणि तपास यंत्रणांसाठी व्हॉट्सअॅप सध्या डोकेदुखी ठरत आहे. कारण व्हॉट्सअॅपचा वापर लोकांची माथी भडकावण्यासाठी, हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आपण खासगीत व्हॉट्सअॅपवर जे बोलतो ते कोणीही तिसरा व्यक्ती पाहू शकत नाही किंवा ते पुर्णपणे सुरक्षित असतं असं जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. व्हॉट्सअॅप फेसबुकवर नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचाही डेटा गोळा करते. संबंधित देशांमधील कायदा आणि सुव्यवस्थेशी संदर्भात प्रकरणांमध्ये सरकारने हा डेटा मागितल्यास व्हॉट्सअॅपकडून तो पुरवला जातो. आपले मेसेज सुरक्षित असले तरी पोलीस नाव, आयपी अॅड्रेस, मोबाइल क्रमांक, लोकेशन, मोबाइल नेटवर्क आणि मोबाइल हॅण्डसेटची माहिती मिळवू शकतं. -
इतकंच नाही तर पोलीस तुम्ही कोणाशी चॅट करत आहात, किती वेळ चॅट करत होतात आणि किती वाजता करत होतात याचीही इत्थंभूत माहिती मिळवू शकतं. भारतात व्हॉट्सअॅप युजर्ससाठी वेगळा कायदा नाही. पण पोलीस तुम्ही खालीलपैकी एखाद्या नियमाचं उल्लंघन केल्यास व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत अटक करु शकतं.
तुमच्या ग्रुपमधील सदस्य बेकायदेशीर गोष्टींना खतपाणी घालत असेल तर ग्रुप अॅडमिनची माहिती मिळवून पोलीस त्याला अटक करु शकतात. व्हॉट्सअॅपवर पॉर्न क्लिप, खासकरुन चाइल्ड पॉर्न, फोटो किंवा अश्लील गोष्टी शेअर केल्यास अटक होऊ शकते. महत्त्वाच्या व्यक्तींचे छेडछाड केलेले फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्याने पोलीस अटकेची कारवाई करु शकतात. एखाद्या महिलेने व्हॉट्सअॅपवरुन आपल्याला त्रास दिला जात असल्याची तक्रार केल्यास पोलीस अटक करु शकतात एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावे व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार केलंत तर तुम्ही पोलीस कारवाई ओढावून घेत आहात धार्मिक भावना किंवा एखाद्या प्रार्थनास्थळासंबंधी द्वेषयुक्त संदेश पाठवल्याबद्दल तुम्हाला पोलीस बेड्या ठोकू शकतात. खोटी बातमी शेअर करणंही तुम्हाला महागात पडू शकतं. संवदेनशील विषयांवर हिंसा भ़डकावणारा संदेश व्हॉट्सअॅपवर शेअर करण्याआधी विचार करा..यासाठी जेलमध्ये जाऊ शकता. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ड्रग्ज किंवा इतर बंदी घालण्यात आलेली गोष्ट विकण्याचा प्रयत्न करणं कायद्याविरोधात आहे. -
-
त्यामुळे यापुढे व्हॉट्सअॅपवर कोणतीही गोष्ट शेअर करताना किंवा आलेला फोटो, संदेश किंवा व्हिडीओ शेअर करताना आधी विचार करा.

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”