-
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बजाजची चेतक ही इलेक्ट्रिक स्कुटर अखेर भारतीय बाजारात लाँच झाली आहे. Bajaj Auto ने मंगळवारी(दि.१४) बहुप्रतिक्षित Chetak Electric स्कुटर लाँच केली. यासोबतच किंमतीबाबतही खुलासा करण्यात आला. (सर्व छाया सौजन्य-सोशल मीडिया)
नवीन चेतक कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये (अर्बन आणि प्रीमियम) उतरवली आहे. आजपासून(दि.15) दोन हजार रुपयांमध्ये कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा पुण्यातील चार आणि बंगळुरूमधील 13 डिलरशिपमधून बुकिंगला सुरूवात झाली आहे. -
चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः आधुनिक झालीये. रेट्रो-मॉडर्न लुकमुळे ही स्कुटर अत्यंत प्रीमियम दिसते.
-
ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर असून Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केलीये.
-
नव्या चेतक इलेक्ट्रिकमध्ये Eco आणि Sport मोड देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात चेतकची टक्कर Ather 450 आणि Okinawa Praise यांसारख्या स्कुटरशी होईल.
-
विशेष म्हणजे या स्कुटरची सर्वप्रथम विक्री पुणे आणि बंगळुरूमध्ये होईल. त्यानंतर अन्य मेट्रो शहरांमध्ये ही स्कुटर विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.
-
ही स्कुटर बनवण्यासाठी सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आलाय. स्कुटरमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि फुल-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल आहेत.
-
स्कुटरच्या दोन्ही बाजूंना 12-इंचाचे अॅलॉय व्हिल्स आहेत. उल्लेखनीय म्हणजे नव्या इलेक्ट्रिक चेतकमध्ये रिव्हर्स गिअरचाही पर्याय आहे.
-
या स्कुटरवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटी मिळेल, याशिवाय बजाजकडून या स्कुटरसाठी तीन फ्री सर्व्हिस मिळतील.
-
बजाज चेतकची इलेक्ट्रिक मोटार 5.36 bhp पीक पावर आणि 16 Nm टॉर्क निर्माण करते. स्कुटरमध्ये 3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. या स्कुटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर करण्यात आलाय, घरातल्या स्टॅंडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे.
-
एका तासात 25 टक्के आणि पाच तासात फुल चार्ज होते. चेतकमध्ये दिलेल्या बॅटरीची लाइफ जवळपास 70 हजार किलोमीटर आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
-
मोनोशॉक सस्पेंशन यामध्ये दिलं असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत. इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरची रेंज, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे.
-
स्कुटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.
-
देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा 1972 मध्ये लॉन्च केली होती.
-
सुमारे 34 वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली होती. कारण, तोपर्यंत ऑटोमॅटिक स्कूटर्सने बाजारावर कब्जा केला होता.
-
ही स्कूटर सुरुवातीला लॉन्च करण्यात आली त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती.
-
या स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते.
-
या स्कूटरमध्ये कंपनीने 145 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले होते. जे 7.5 बीएचपी पावर देत होते तसेच 10.8 एनएमचा टार्क ते निर्माण करीत होते.
किंमत – ड्रम ब्रेक असलेल्या अर्बन व्हेरिअंटची किंमत एक लाख (एक्स-शोरुम) आणि डिस्क ब्रेक असलेल्या प्रीमियम व्हेरिअंटची किंमत 1.15 लाख(एक्स-शोरुम) रुपये ठेवण्यात आली आहे.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…