-
जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवनाबरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखल्या जातात. इतकंच नाही, तर त्यांचा आवाजही मधूर असून, त्यांच्या भजनांनी लाखो लोकांना रिझवून टाकलं आहे. (फोटो सौजन्य : http://www.iamjayakishori.com)
-
जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीतं गायली आहेत.
-
जया किशोरी यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे.
-
त्यांच्या वडिलांचं नाव शिव शंकर शर्मा आहे. तर आईचं नाव सोनिया शर्मा आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आध्यात्माशी जोडून घेतलं होतं.
-
त्यांची ओळख प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे त्यांची प्रवचन ऐकायला लोक नेहमी गर्दी करतात.
-
कुटुंबात धार्मिक वातावरण असल्यानं त्याचा परिणाम जया किशोरी यांच्या मनावर झाला. त्यांच्या आजीकडून त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्याचाही परिणाम त्यांच्या मनावर झाला.
-
त्यांची अनेक भजनं लोकप्रिय झालेली आहेत आणि त्यांना ऐकणारे कोट्यवधी चाहतेही आहेत. त्यांच्या भजनाचे अल्बमही आलेले आहेत.
-
शिव स्तोत्र', 'सुंदरकांड', 'मेरे कान्हा की, श्याम थारो खाटू प्यार', 'दीवानी मे श्याम की' अशी जया किशोरी यांच्या अल्बमची नावं आहेत.
-
गुगलवरती त्यांच्या भजनांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जाते. त्यांचं वय, वैवाहिक आयुष्य, पती आदीबद्दल माहिती सर्च केली जाते.
-
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती अशी आहे की, त्यांचं अजून लग्न झालेलं नाही. मात्र, माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की, "योग्य वेळी आपण विवाह करू."
-
जया किशोरी यांच्या वडिलांनीही त्या लग्न करणार असल्याचा म्हटलेलं आहे. आध्यात्मिक मार्गाच्या सुरूवातीच्या काळात जया किशोरी यांना गुरू गोविंदराम मिश्र यांनी शिक्षण दिलं.
-
गुरु गोविंदराम मिश्र यांनीच त्यांना किशोरी ही पदवी दिली होती, असं सांगितलं जातं.
-
जया किशोरी या आपल्या प्रचवनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दान करतात.
-
प्रचवनामधून येणाऱ्या पैशातून दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते. या ट्रस्टकडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणाचीही काळजी घेतली जाते.
-
जया किशोरी यांचं यूट्यूबर अधिकृत चॅनल असून, त्याला ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना सबस्क्राईब केलेलं आहे आणि फेसबुकवरही त्यांच्या पेजवर लाखो लोक जोडलेले आहेत.

Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”