-
गोव्यातील इलेक्ट्रिक वाहन (EV) स्टार्ट-अप Kabira Mobility ने भारतात दोन नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केल्या आहेत.
-
कंपनीने KM3000 आणि KM4000 या दोन नव्या ई-बाईक आणल्या आहेत.
-
दोघांपैकी KM4000 ही भारतातील आतापर्यंतची सर्वात फास्ट इलेक्ट्रिक बाइक असल्याचं म्हटलं जातंय.
-
KM3000 मध्ये कंपनीने 4kWh बॅटरीचा वापर केला असून सोबत BLDC (ब्रशलैस DC इलेक्ट्रिक मोटर) आहे. ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इकॉनॉमी मोडमध्ये 120KM ची रेंज देते, तर स्पोर्ट्स मोडमध्ये 60km ची रेंज मिळते.
-
तर, KM4000 या बाइकमध्ये कंपनीने 4.4kWh ची बॅटरी आणि 8kW मोटर दिली आहे.
-
KM4000 ही बाईक ईको मोडमध्ये 150 किमी प्रवास करु शकते. 120KM प्रति तास इतका KM4000 बाइकचा टॉप स्पीड आहे.
-
तर, स्पोर्ट्स मोडमध्ये KM4000 ही बाइक 90 किमीचा प्रवास करु शकते.
-
सध्या कबिरा मोबिलिटीचे भारतात दोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. यातील एक गोव्यात तर दुसरा कर्नाटकच्या धारवाडमध्ये आहे.
-
पॉवर आणि चार्जिंग दोन्ही बाइकमध्ये दिलेली बॅटरी 2 तास 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. तर, बूस्ट चार्जिंगद्वारे 50 मिनिटात पूर्ण चार्ज होऊ शकते. ईको चार्ज मोडमध्ये बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटांचा वेळ लागतो.
-
किती आहे किंमत? कबिरा मोबिलिटीने KM3000 या ई-बाईकची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 26 हजार 990 रुपये ठेवली आहे. तर, KM4000 ची एक्स-शोरुम किंमत 1 लाख 36 हजार 990 रुपये आहे. (सर्व फोटो: kabiramobility.com)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक