-
कोरोना, लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेकांची जीवनशैली बदलली आहे. गेल्या वर्षभरापासून सतत बसून काम केल्याने अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो.
-
मात्र कित्येकदा जीम, योगा, डाएट करुनही वजन कमी होत नाही. यावेळी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात काही ठराविक फळांचा समावेश केलात तर तुमचे वजन नक्की कमी होऊ शकते.
-
फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. फळांमध्ये कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण कमी असते.
-
त्यामुळे वजन कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये फळांचाही समावेश करणे गरजेचे आहे.
-
सफरचंद -सफरचंदमध्ये कॅलरीची संख्या कमी असते. तर दुसरीकडे फायबर, व्हिटॅमिन सी आणि मिनिरल्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
किवी: किवी या फळाला पोषक तत्त्वांची खाण समजली जाते. किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, ई, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक घटक असतात. हे सर्व घटक शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमचे अतिरिक्त वजन कमी होते.
-
कलिंगड – कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यात 95 टक्के पाण्याचा समावेश असल्याने ते शरीराला जास्त काळापर्यंत ताजेतवाने ठेवते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
संत्री – संत्री हे चवीला आंबट गोड असली तरी यात अनेक पोषक घटक असतात. यात कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. तसेच संत्रीमध्ये व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात असल्याने ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
-
पेर – पेरमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. पेर खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. पेर खाल्ल्याने कोलेस्ट्रोलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
टोमॅटो – टोमॅटो खाल्ल्याने शरीरातील कार्निटाइनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि सहजरित्या तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय