-
उन्हाळ्यात केळी लवकर खराब होतात. कारण उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे केळी एक-दोन दिवसांत काळी पडते. यासाठी काही लोक कच्ची केळी खरेदी करतात. पण कच्ची केळी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
-
केळी हे असे फळ आहे की ते फार लवकर काळे होते आणि सडू लागते. केळी खराब होऊ नये म्हणून तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
-
फळे चांगली राहण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र केळी फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. अशात ती बाहेर ठेवल्यास काळी पडून खराब होतात.
-
केळी साठवणे हे एक मोठे आव्हान आहे. आज आम्ही तुम्हाला अशा ट्रिक्स सांगत आहोत, ज्याद्वारे पिकलेली केळी अनेक दिवस पिवळी आणि ताजी राहतील.
-
केळीच्या देठाला रॅप करा (गुंडाळा): जेव्हाही तुम्ही बाजारातून केळी विकत घेता, सर्वप्रथम घरी आल्यानंतर कागद किंवा प्लास्टिकने त्याचा देठ गुंडाळा. असे केल्याने केळी लवकर खराब होणार नाही.
-
केळी स्टोर करा. केळी बऱ्याच दिवस साठवण्यासाठी, केळी रुम टेंपरेचरवर ठेवा. फ्रिज किंवा कोणत्याही उबदार ठिकाणी केळी लवकर खराब होतात.
-
व्हिटॅमिन सीच्या वापराने केळी खराब होणार नाही: अनेक दिवस केळी साठवण्यासाठी, व्हिटॅमिन सी टॅब्लेट एका ग्लासच्या पाण्यात विरघळवून घ्या आणि नंतर त्यात केळी बुडवा. यामुळे केळी लवकर खराब होणार नाही.
-
हँगरमध्ये केळी लटकवा: जर तुम्ही केळी हँगरमध्ये लटकवली तर केळी लवकर खराब होणार नाहीत. हे विचित्र वाटेल पण हे खरे आहे.
-
वॅक्स पेपरने गुंडाळा : त्वचेला वॅक्स करण्यासाठी आपण अनेकदा वॅक्स पेपर वापरतो. पण केळी ताजे ठेवण्यासाठीही आपण या पेपरचा वापर करू शकतो. यासाठी केळी गुंडाळून किंवा वॅक्स पेपरने झाकून ठेवा. (All Photos : freepik)

विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…