-
देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात. विमान प्रवासापेक्षा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवासी जास्त सामान घेऊन जातात. (Photo: Freepik)
-
पण कधी कधी रेल्वेने प्रवासादरम्यान आपण आपलं काही सामान रेल्वेतच विसरून जातो. पण त्यानंतर अनेक प्रवासी ते सामान मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा कंटाळा करतात आणि ते सामान सोडून देतात. (Photo: Freepik)
-
अनेकांना वाटतं की ट्रेनमध्ये एकदा सामान विसरून आलो तर ते परत मिळत नाही. तुम्हालाही असंच वाटत असेल तर रेल्वेचा हा नियम एकदा वाचाच. प्रवासी विसरून गेलेल्या या सामानांच रेल्वे पुढे काय करते, जाणून घेऊया. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही रेल्वे प्रवासा दरम्यान तुमचं सामान विसरून आले तर ताबडतोब त्याच स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच आरपीएफ पोलिसांना याची माहिती द्या. (Photo: Freepik)
-
जे सामान तुम्ही ट्रेनमध्ये विसरून आले असता ते पुढे स्टेशनवर जमा केली जाते. रेल्वे कर्मचारी स्टेशन मास्टरकडे हे सामान जमा करण्यात येतं. यानंतर सामान काय आहे या आधारे पुढील प्रक्रिया ठरवली जाते. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही ट्रेनमध्ये दागिने विसरून आले असाल तर ते २४ तास रेल्वे स्टेशनवर ठेवले जाते. जर कोणी २४ तासात हे विसरून गेलेले दागिने घ्यायला आलं तर योग्य खात्री करूनच मालकाकडे सोपवले जातात. अन्यथा ते दागिने झोन कार्यालयात पाठवले जाते. (Photo: Freepik)
-
जर तुम्ही एखादी सामान्य गोष्ट ट्रेनमध्ये विसरले असाल तर तीन महिने रेल्वे स्टेशन कार्यालयात ठेवण्यात येतात. तीन महिन्यात कुणी ते सामान घ्यायला आलं नसेल तर ते पुढे पाठवले जातात. . (Photo: Freepik)
-
सामान बराच काळ पडून राहिल्यास त्याची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचेही नियम आहेत. (Photo: Freepik)
-
या प्रक्रियेत सामानाची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशाला बोलावून त्याची माहिती जागेवर देण्याबरोबरच मागितलेली कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. त्यानंतर तुमचा माल तुम्हाला परत केला जाईल. अलीकडच्या काळात काही स्थानकांवर रिकव्हरीनंतर सामान घरी पोहोचवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. Photo: Freepik)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल