-
दरवर्षी ८ जून रोजी ‘जागतिक ब्रेन ट्युमर दिवस’ साजरा केला जातो.
-
आपल्याला अनेक आजारांबद्दल माहिती असते. पण मेंदूच्या, डोक्याच्या आजारांबद्दल आपण कमी जागरूक असतो.
-
यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यावर उपचार करणे कठीण होते.
-
‘जागतिक ब्रेन ट्युमर दिना’च्या निमित्ताने या आजाराच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
-
डोकं दुखणे : ब्रेन ट्युमरचे सर्वात पहिले आणि सामान्य लक्षण म्हणजे सतत डोकं दुखणे.
-
डोकेदुखीच्या वेदना कधीकधी इतक्या वाढतात की त्या व्यक्तीचे मानसिक संतुलनदेखील बिघडते.
-
उलटी आणि मळमळ : डोकेदुखीसोबतच उलटी सुरु होणे, हे ब्रेन ट्युमरचे दुसरे लक्षण आहे.
-
कधी कधी सकाळपासून डोकं दुखतं आणि दिवसभर मळमळ व्हायला लागते.
-
चक्कर येणे : अशक्तपणामुळे कधी कधी चक्कर येते. पण जर सतत चक्कर येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
-
चक्कर येऊन खाली पडत असाल तर हे ब्रेन ट्युमरचे लक्षण आहे.
-
बोलण्यात अडचण : ब्रेन ट्युमर जसा जसा वाढत जातो तसं बोलताना अडचण जाणवू लागते. तोंडातून स्पष्ट उच्चार येत नाहीत.
-
स्मरणशक्ती कमी होणे : ब्रेन ट्युमरमुळे व्यक्तीच्या स्वभाव चिडचिडा होऊ शकतो.
-
विसराळूपणा वाढल्यास त्या व्यक्तीला ब्रेन ट्युमर झालेला असू शकतो.
-
अंधुक दिसणे : अंधुक दिसणे किंवा दृष्टी जाणे, हे देखील ट्युमरचे लक्षण आहे.
-
ब्रेन ट्युमरची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. (सर्व फोटो सौजन्य : Freepik, Unspalsh)

२८ जुलैनंतर ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! अचानक वाढेल खर्च तर प्रियकरासोबत होईल भांडण; वाचा तुमच्या नशिबी काय…