-
पुणे हे अतिशय सुंदर शहर आहे. पावसाळ्यात पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र आहे. या ऋतूमध्ये इथलं वातावरण खूप आल्हाददायक होतं.
-
जर तुम्ही पावसाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुण्यात फिरण्याचाही बेत करू शकता.
-
आज आपण जाणून घेऊया पावसाळ्यात तुम्ही पुण्यात कोणकोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
-
लोणावळा – लोणावळा हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथील किल्ले, नद्या, सौंदर्य आणि हिरवळ तुमच्या मनाला भुरळ घालतील.
-
येथे तुम्हाला शांतता अनुभवता येईलच. पण त्याच बरोबर तुम्हाला येथे हायकिंग आणि ट्रेकिंगचा आनंदही घेता येईल.
-
तुम्हाला येथे विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेता येईल.
-
खंडाळा – बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांमध्ये खंडाळा हे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
-
जर तुम्ही पावसाळ्यात फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही इथे जरूर जा.
-
हे ठिकाण खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला ते नक्कीच आवडेल.
-
पाचगणी – तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
-
पावसाळ्यात हे हिल स्टेशन आणखीनच सुंदर बनते. आजूबाजूला हिरवळीने झाकलेली दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील.
-
लवासा – हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
-
येथे तुम्ही तिकोना किल्ला, घनगड किल्ला, ताम्हिणी घाट आणि प्रोमेनेड सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
-
जर तुम्हाला साहसी उपक्रमांची आवड असेल तर तुम्ही कॅम्पिंग, रॉक क्लाइंबिंग, व्हॅली क्रॉसिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.
-
सर्व प्रातिनिधिक फोटो : इन्स्टाग्राम/@imjagdishpatil

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?