-
कार्यालयामध्ये विविध स्वभावाचे सहकारी तुम्हाला आढळून येतील. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. कधी कधी स्वभाव पटत नसल्याने त्यांच्याशी जुळवून घेणे कठीण जाते. (source – pexels)
-
अशा सहकाऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत. (source – pexels)
-
आपले मत अनेकवेळा व्यक्त करा – तुमच्या सहकाऱ्याने तुम्ही बोललेले ऐकले नाही तर आपले मत त्याला ठासून सांगा, जेणेकरून तो तुमचे काम गांभीर्याने घेईल. (source – pixabay)
-
जो पर्यंत तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला स्पष्ट शब्दांत आणि काटेकोरपणे आपले मत सांगणार नाही, तोपर्यंत तुम्हाला त्रास होईल असाच तो वागेल. (source – pixabay)
-
सहकाऱ्याचे व्यक्तिमत्व स्विकारा – आपल्या सहकाऱ्याचे व्यक्तीमत्व स्विकारा. त्याला त्याच्या पद्धतीने काम करू द्या. (source – pixabay)
-
जेव्हा व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम दिले जाते तेव्हा तो ते उत्कृष्टपणे करण्याची शक्यता अधिक असते (source – pixabay)
-
गप्पागोष्टींपासून दूर राहा – काम व्यवस्थित न करणाऱ्या कर्मचाऱ्याविषयी गप्पा सुरू असल्यास त्यात पडू नका. अशा गप्पागोष्टींपासून दूर राहा. (source – pixabay)
-
दुसऱ्या व्यक्तीविषयी होत असलेल्या नकारात्मक चर्चांपासून स्वत:ला दूर ठेवल्यास कार्यस्थळामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. (source – pixabay)
-
वरिष्ठांशी बोला – एखादा सहकारी तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर त्याबाबत तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या. (source – pixabay)
-
वरिष्ठ तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग सांगू शकतील. (source – pexels)
-
तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये राग येतो आणि कोणत्या कारणांमुळे राग येतो, याबाबत माहिती घ्या. तुम्हाला राग येईल अशी स्थिती तुमचा सहकारी निर्माण करत असेल तर तशी स्थिती टाळा. (source – pexels)
-
सहकाऱ्याच्या सकारात्मक वैशिष्ट्यांवर लक्ष द्या, त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे कौतुक करा. (source – pexels)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक