-
Chandra Grahan 2022: ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी यावर्षात शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे
-
दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी वाजता सुरू होणारे हे चंद्रग्रहण संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत कायम असेल. कोणत्या राशीवर चंद्र ग्रहणाचा कसा परिणाम होणार हे जाणून घेऊयात…
-
मेष राशीच्या मंडळींसाठी चंद्र ग्रहण अशुभ ठरू शकते. वाहन प्रवास शक्य झाल्यास टाळावा.
-
वृषभ राशीच्या मंडळींनी धनाची काळजी घेण्याची गरज आहे.
-
मिथुन राशीच्या मंडळींना धनप्राप्ती व प्रगतीची संधी आहे.
-
कर्क राशीच्या मंडळींना चंद्र ग्रहण लाभदायक ठरू शकते. कौटुंबिक साथ लाभेल
-
सिंह राशीसाठी चंद्रग्रहण अशुभ ठरू शकते. या काळात मानसिक चलबिचल होऊ शकते.
-
कन्या राशीच्या मंडळींना ग्रहण काळात शारीरिक श्रम करावे लागू शकतात.
-
तूळ राशीच्या मंडळींना वैवाहिक कलह सहन करावा लागू शकतो.
-
वृश्चिक राशीसाठी चंद्रग्रहण प्रगतीचा योग घेऊन येत आहे. प्रलंबित कामात यश लाभू शकते.
-
धनु राशीच्या मंडळींना चिंताग्रस्त मनस्थितीमुळे चंद्र ग्रहणाचा काळ अशुभ ठरू शकतो.
-
मकर राशीने ग्रहण काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
-
कुंभ राशीच्या मंडळींसाठी ग्रहण काळात धनलाभाचे योग आहेत.
-
मीन राशीच्या मंडळींसाठी चंद्र ग्रहण शुभ ठरू शकते, यावेळी आर्थिक लाभाची मोठी संधी आहे, मात्र पैसे काळजीपूर्वक गुंतवणे हिताचे ठरेल.
-
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा