-
तुम्हाला पावसाळा आवडतो का? तुम्हाला पावसाळ्यात फिरायला आवडते का? होय तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. पावसात फिरण्याची मज्जा काही वेगळीच असते.
-
पावसाळ्यात प्रवास करणे मजेशीर असले तरी काहीवेळा या हवामानात बाहेर पडणे जरा अवघड असते, खासकरून जर तुम्ही तयारी न करता तेव्हा. जर तुम्ही पावसाळ्यात भारतात फिरण्याचा प्लॅन असेल तर या गोष्टी तुमच्याबरोबर ठेवा.
-
तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बाहेर जाता किंवा तुमच्या जवळ रेनकोट असणे आवश्यक आहे. लांब ट्रेंच कोट स्टाईलमधील कोट उत्तम आहेत. तुम्ही पँटसहीत रेनकोटही खरेदी करू शकता.
-
पावसाळ्यात अशा ट्रॅव्हल बॅगसह बाहेर जा, जी वॉटर प्रूफ असेल किंवा तुमच्याकडे बॅग कव्हर असेल. तसेच, त्यात अनेक आतील खिसे असावेत जेणेकरून तुमचा फोन, घड्याळ इत्यादी खराब होण्यापासून वाचतील.
-
कपड्यांचे फॅब्रिक आणि स्टाईलही पावसाचा मूड बघूनच ठरवावी. पुरुषांसाठी गुडघ्यापर्यंत पॅन्ट, शॉर्ट्स आणि महिलांसाठी असतील तर अँकल लेंथ स्टाईल निवडा.
-
कपड्यांचे फॅब्रिक असे असावे की ते लवकर सुकेल, अन्यथा, ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ फिरल्याने आजारी पडू शकतो. अतिरिक्त पॉलीबॅग प्लॅस्टिक पिशव्या ठेवा म्हणजे कपडे ओले झाले तर ठेवता येतील.
-
पावसात रस्त्यावर चिखल होतो, हे लक्षात घेऊनच चप्पल-शूज तुमच्याबरोबर घ्या. नेहमी चप्पल-शूजची एक जास्तीची जोडी तुमच्याबरोबर ठेवा.
-
कोणत्याही ऋतूत बाहेर जाताना मच्छरपासून वाचण्यासाठी कॉईल तुमच्याबरोबर ठेवा. विशेषतः पावसाळ्यात. मच्छरपासून वाचण्यासाठी क्रिम बॅगच्या खिशात ठेवा जेथून ते सहज सापडेल.
-
पावसात लाईट गेल्यानंतर मोबाईल चार्ज करण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे पॉवर बँक तुमच्याबरोबर ठेवा.

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”