-
हल्ली प्रत्येकाची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी इतक्या वाईट झाल्या आहेत की, आपण कधीही काहीही खातो. रात्री उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठणे, जेवणाच्या नावाखाली काहीही खाणे या तुमच्या रोजच्या सवयी झाल्या आहेत. (photo – freepik)
-
पण याच सवयी प्रत्येक लहान-मोठ्या आजाराचे मूळ ठरत आहेत. आणि तुम्हीही आजारी पाडत आहे, अशावेळी निरोगी जीवनशैली फॉलो करुन तुम्ही जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. (photo – freepik)
-
याच विषयावर फिटनेस ट्रेनर ऋषभ तेलंग यांनी सांगितले की, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये काही खास पद्धतींचा अवलंब केला तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकता. (photo – freepik)
-
पण याच सवयी प्रत्येक लहान-मोठ्या आजाराचे मूळ ठरत आहेत. आणि तुम्हीही आजारी पाडत आहे, अशावेळी निरोगी जीवनशैली फॉलो करुन तुम्ही जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. (photo – freepik)
-
तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. फिटनेस ट्रेनर गरिमा गोयल यांनी सांगितले की, सकाळी हलका व्यायाम करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. (photo – freepik)
-
तुम्ही सकाळच्या ऐवजी संध्याकाळी व्यायाम करण्यास प्राधान्य देत असाल, तर तुम्ही सकाळी काही विशेष बॉडी अॅक्टिव्हिची कराव्यात. (photo – freepik)
-
सकाळी उठल्यानंतर तुम्ही काही स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. कारण सकाळी वर्कआउट केल्याने चयापचय तर वाढतोच पण कॅलरी जलद बर्न होतात. सकाळी हलका व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य तर सुधारतेच पण मानसिक स्थितीही सुधारते. (photo – freepik)
-
शरीर आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणेही गरजेचे आहे. जर तुम्ही सकाळी कोवळा सूर्यप्रकाश घेतला तर तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल. (photo – freepik)
-
सर्कॅडियन रिदम हे शरीराचे अंतर्गत घड्याळ आहे, जे तुमच्या झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र नियंत्रित करते. (photo – freepik)
-
तुमचे कुटुंब आणि मित्रांबरोबरचे मजबूत नाते तुम्हाला तणावापासून दूर ठेवते. उत्तम मानसिक आरोग्यासाठी तणावापासून दूर राहणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर क्वॉलिटी टाईम घालवून तुम्ही तणाव दूर करू शकता आणि तुमची मानसिक स्थिती सुधारू शकता. (photo – freepik)
-
तुमची चांगली मानसिक स्थिती तुमच्या कामात सुधारणा आणते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण करा, फिरायला जा किंवा वॉकला जा. तुम्ही तुमच्या प्रियजनांना जवळ करुन, केवळ तुमचे नातेच सुधारत नाही तर तुमचे जीवन देखील निरोगी बनवता. (photo – freepik)
-
सामाजिक संवाद भावनिक अभिव्यक्तीसाठी उत्कृष्ट संधी प्रदान करतात. यामुळे एकटेपणा आणि एकाकीपणाची भावना कमी होते. (photo – freepik)
-
वाचनाची सवय लावा. काहीही वाचा. दररोज किमान १० पाने वाचा. वाचनाची सवय तुमच्या फिटनेसशीही संबंधित आहे. तुम्हाला जे आवडते तेच रोज वाचा. (photo – freepik)
-
तुम्हाला माहिती आहे की, वाचनाची सवय हा एक उत्तम मानसिक व्यायाम आहे जो मानसिक तंदुरुस्तीला चालना देतो. वाचन मेंदूला चालना देते, ज्ञानाचा विस्तार करते आणि संज्ञानात्मक कार्य वाढवते. (photo – freepik)


