-
कंगव्याचा वापर आपण दररोज करतो. केस विंचरण्यासाठी कंगवा वापरला जातो. केसांमधून गुंता सोडविण्यासाठी कंगव्याचा आपण वापर करतो.
-
पण तुम्ही कधी कंगव्याचा वापर स्वयंपाकघरात केला आहे का? बहुतेक गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात.
-
काही गृहिणी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओपैकी एका व्हिडीओबद्दल माहिती तुम्हाला देत आहोत, ज्यात कंगव्याचा अनोखा वापर करून दाखवण्यात आला आहे.
-
गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
तुम्ही कधी पालेभाज्या चिरण्यासाठी कंगव्याचा वापर केला आहे का? नाही ना.. मग एकदा कंगव्याच्या साहाय्याने भाज्या चिरुन बघा.
-
हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. पालेभाज्या आणि कंगव्याचा हा अनोखा जुगाड एका महिलेने करुन दाखविला.
-
एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. गृहिणीने, मेथीची भाजी घेतली आणि एक नवीन कंगवा घेतला. त्यानंतर मेथीच्या भाजीचे दोन भाग केले. त्यातील काही मेथी घेऊन महिलेने त्यावर कंगव्याचे दात फिरविले.
-
केस ज्या प्रमाणे विंचरले जातात, त्याचप्रमाणे महिला मेथीची भाजी विंचरताना दिसली. यामुळे मेथीच्या भाजीची पाने सहज निघतील आणि भाजी सहज चिरली जाईल, असे महिलेने सांगितले.
-
पालेभाज्या साफ करायला, चिरायला फार वेळ लागतो, म्हणून कंगव्याच्या मदतीने तुमचे पालेभाज्या चिरण्याचे काम सोपे होईल, असे महिलेचे म्हणणे आहे.
-
Indian Vlogger Pinki या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
-
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.) (फोटो सौजन्य: freepik)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”