-
तुम्हीही अगदी हौशीने घरात तुळशीचे रोप लावले असेल आणि रोज निगा राखूनही, पाणी देऊनही तुळशीची पाने सूकत असतील तर आज आपण त्यावर सोपे जुगाडू उपाय पाहणार आहोत.
-
तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यास निदान ४ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळू शकेल.
-
तुळशीला पाणी देताना मातीचा वरचा थर (अंदाजे 2 इंच) तपासावा. जर ते कोरडे असेल तर आपण आपल्या रोपाला पाणी द्यावे. जास्त किंवा कमी पाण्याने तुळशीच्या रोपाचे नुकसान होऊ शकते
-
तुळशीच्या रोपाची मृत किंवा संक्रमित पाने वेळोवेळी काढून टाका. रोपांची छाटणी चांगली वाढ होण्यासाठी मदत करते
-
तुळशीची लागवड करताना फक्त माती न वापरता ७०% माती आणि ३०% वाळू यांचे मिश्रण वापरा. याचा फायदा असा आहे की माती आणि वाळूचे मिश्रण पाणी टिकवून ठेवत नाही व पाने कुजण्यापासून प्रतिबंधित करते
-
तुळशीच्या रोपाला कीड लागु नये यासाठी मुळाशी किंवा पानांना कडुलिंबाच्या तेलाचा लेप द्या. आपण एक लिटर पाण्यात कडुनिंबाच्या तेलाचे दहा थेंब मिसळून फवारणी करू शकता
-
आपण सुकलेल्या तुळशीच्या पानांचा सुद्धा वापर करू शकता. या वाळलेल्या पानांचा वापर करून तुळशीचा हर्बल चहा तयार करता येईल किंवा तुळशीची वाळलेली पाने इतर औषधी वनस्पती आणि फुले एकत्र करून सुगंधी पॉटपॉरी तयार करता येईल
-
सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यासाठी आपण या वाळलेल्या तुळशीच्या पानांचे सूप बनवून सेवन करू शकता. शिवाय नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वाळलेली पाने कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”