-
फळे आणि भाज्या जास्त दिवस टिकविण्यासाठी अनेक जण त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. त्याशिवाय काही जण आठवडा किंवा १५ दिवसांचा भाजीपाला एकदाच खरेदी करून, तो फ्रिजमध्ये एकत्र ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु तुम्हाला माहीत आहे का की, फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हानिकारक असू शकते. अशा काही गोष्टी आहेत की, ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या ताज्या राहण्याऐवजी खराब होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्याच वेळी अशा काही गोष्टी आहेत, ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. रेफ्रिजरेटरमधील असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याची हानी होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशी काही फळे आणि भाज्या आहेत, ज्या चुकूनही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. जर तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवले, तर त्यामुळे त्या ठरावीक फळे आणि भाज्यांमध्ये विष निर्माण होऊ शकते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कच्चा बटाटा- रेफ्रिजरेटरमध्ये कच्चा बटाटा ठेवल्यास त्याची चव बदलू शकते. त्याशिवाय त्यात हानिकारक घटकांची उत्पत्ती होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लसूण- अनेक जण बाजारातून सोललेला लसूण आणतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. हेदेखील हानिकारक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कांदा- फ्रिजमध्ये कांदा ठेवल्याने त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि त्यात बुरशीची वाढ होते. अर्धा चिरलेला कांदा चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शिजवलेला भात- अनेक महिला भात उरला असल्यास, तो फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केळी- फ्रिजमध्ये केळी ठेवू नका. कारण- तसे केल्यामुळे ती काळी पडतात आणि त्यांची चवही बिघडते.मोसंबी, लिंबू, आंबट फळे इत्यादी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. (फोटो सौजन्य: Freepik)

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…