-
वाढता ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली यांमुळे लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक वेळेवर झोपायला तर जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पण रात्रभर त्यांना झोप न लागण्याच्या म्हणजेच निद्रानाशाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. निद्रानाशाची ही समस्या अनेक प्रकारचे आजारदेखील निर्माण करू शकते. अनेक जण झोप यावी यासाठी झोपेच्या गोळ्या घेतात. (फोटो सौजन्य: Freepik) -
पण त्याऐवजी तुम्ही झोपण्यापूर्वी बडीशेप टाकलेले दूध प्या. कारण- गोळ्यांचा हळूहळू शरीरावर खूप नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही झोप येण्यासाठी रात्री नैसर्गिक उपायाचा अवलंब करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
खरं तर, बडीशेपमध्ये मॅग्नेशियम, पोटेशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे मेंदूला शांत करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik) -
त्याच वेळी दूधही झोप आणण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्ही दूध बडीशेप मिसळून पिऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बडीशेप टाकलेले दूध बनविण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये दूध ओता आणि त्यात एक चमचा बडीशेप घालून, तुम्ही ते मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गोडवा आणण्यासाठी तुम्ही त्यात मध किंवा साखरदेखील टाकू शकता. झोपण्याआधी ३० मिनिटे आधी दूध पिणे खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बडीशेप टाकलेले दूध प्यायल्याने मन शांत होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik) -
बडीशेपमिश्रित दुधाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. दिवसभराचा थकवा दूर होतो आणि पचनक्रियादेखील सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”