-
तुम्ही आंब्याचे लोणचे किंवा लिंबूचे लोचणे किंवा इतर पारंपरिक लोणची नक्कीच खाल्ली असतील, पण आता वेळ आली आहे एका झणझणीत आणि ताज्या चवीसाठी! खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, काकडीच्या लोणच्याची एक हटके आणि चविष्ट रेसिपी. पारंपरिक चवीला एक नवीन ट्विस्ट देणाऱ्या या रेसिपीमुळे तुमच्या जेवणात रंग भरतील. काही खास मसाले आणि पद्धती वापरून बनवलेलं हे लोणचं सर्वांच्या पसंतीस उतरतंय, तेही अगदी सहज घरी तयार होईल! एकदा ट्राय करा आणि पाहा, तुमचं जेवण या लोणच्याशिवाय अपूर्ण वाटेल.
-
कधी कधी साध्या जेवणातही काहीतरी झणझणीत आणि ताजं लागावंसं वाटतं, नाही का? मग हे चवदार काकडीचं लोणचं नक्की ट्राय करा! बनवायलाही सोप्पं आणि चवीलाही भन्नाट! साहित्य ५-६ ताज्या काकड्या, २ चमचे मोहरीचे तेल, १ चमचा हळद पावडर, १ चमचा लाल तिखट, १ चमचा मोहरी, १ चमचा हिंग, २ चमचे मीठ, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा बडीशेप, २ चमचे लिंबाचा रस (पर्यायी)
-
सुरुवातीला काकडी नीट धुऊन कोरडी पुसा आणि नंतर तिला छोटे चौकोनी तुकडे करा; ना खूप मोठे, ना खूप छोटे!
त्याचवेळी एका गरम पॅनमध्ये मोहरीचे दाणे टाका आणि सौम्य आचेवर भाजा, जोपर्यंत त्याचा खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत! हाच तो लोणच्याचा जादुई बेस, जो संपूर्ण चव खुलवतो. -
आता वेळ आहे स्वादाला उठाव देण्याची! एका मोठ्या परातीत घ्या तयार केलेले काकडीचे ताजे तुकडे. त्यात घाला भाजलेली मोहरी, हळद, तिखट, हिंग, जिरे पावडर, मीठ आणि खास चव देणारी बडीशेप.
हे सगळं एकसंधपणे मिसळा, जेणेकरून प्रत्येक काकडीच्या तुकड्यावर मसाल्याचा स्वाददार थर बसेल. या पद्धतीने मसाला प्रत्येक घासात झणझणीत अनुभव देतो. -
आता या तयार मसाल्याच्या मिश्रणात घाला मोहरीचं खमंग तेल आणि ताज्या लिंबाचा रस, हे दोन्ही घटक लोणच्याची चव अधिक उठावदार बनवतात. सगळं नीट एकसंध मिसळा, जेणेकरून तेल आणि मसाला प्रत्येक तुकड्यावर मस्तपणे मुरेल.
त्यानंतर हे चविष्ट लोणचं स्वच्छ काचेच्या बरणीत भरून झाकण लावा. ही बरणी दोन-तीन दिवस उन्हात ठेवा, म्हणजे मसाल्याचं मॅरिनेशन योग्य पद्धतीने होईल आणि लोणच्याला येईल पारंपरिक, झणझणीत आणि ताजी चव.
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी…