-
डाळी हा आपल्या अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यांचा वापर आपल्या आहारामध्ये सातत्याने केला जातो. डाळींमध्ये आपण मुख्यतः मूग, मसूर, उडीद, हरभरा, तुर खातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
प्रत्येक डाळीमध्ये वेगळ्या प्रकारची प्रथिने फायबर, लोह, जीवनसत्व आढळतात. शिवाय प्रत्येक डाळीमध्ये पोषक घटक असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दररोज डाळींचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता कधीच भासत नाही. डाळींचे सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
डाळी अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जावान बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण दररोज कोणत्या डाळींचे सेवन करतो आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मूग डाळीचे सेवन आपण अनेकदा खिचडी किंवा वरणामधून करतो. मूग डाळ पालक-मेथीसह बनवली जाते. या डाळीमध्ये भरपूर प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, फॉस्फरस, तांबे, जस्त आणि मॅग्नेशियम असते. या डाळीचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते आणि मधुमेह नियंत्रित राहतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम
-
उडीद डाळीमध्ये पोषक प्रथिने, फायबर, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते; जे शरीर निरोगी ठेवते आणि हाडे मजबूत करते. ही दाळ बहुतेकदा इडली, डोसा, दही वड्यामध्ये वापरली जाते. ही डाळ खाल्ल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मसूर डाळीपेक्षा तुरीच्या डाळीमध्ये प्रथिने कमी असतात. १०० ग्रॅम तूर डाळीमध्ये असलेल्या पोषक तत्वाबद्दल बोलायचे झाले तर यात प्रथिने २२ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, आयर्न ३.१ मिली ग्राम, फॉलिक अॅसिड जास्त प्रमाणात आणि कॅल्शियम ७३ मिलीग्राम असते जे शरीर निरोगी ठेवते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१०० ग्रॅम मसूर डाळीमध्ये प्रथिने २४ ग्रॅम, फायबर १२ ग्रॅम, लोह ६.५ मिलीग्राम, पोटेशियम- ३६९ मिलीग्राम आणि फोलेट असते. या डाळीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. मधुमेह नियंत्रित राहतो आणि वजनही कमी होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य