-
ध्यान म्हणजे अंतर्मनाशी जोडणारा मार्ग
ध्यान ही एक प्राचीन साधना आहे; जी मन, शरीर व आत्मा यांच्यात दुवा म्हणून काम करते. ही केवळ शांती देणारी पद्धत नाही, तर अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी सिद्ध केले आहे की, नियमित ध्यान केल्याने मानसिक स्वास्थ्यात मोठा बदल होतो. -
ध्यानाचे फायदे
ध्यान केल्याने मन शांत होते आणि चिंता कमी होते. आपला मेंदू जिथे भीती तयार होते, त्या भागाचे काम ध्यानामुळे कमी होते. म्हणूनच आज डॉक्टरही काही मानसिक त्रासांवर ध्यानधारणेचा सल्ला देतात. खासकरून पॅनिक अटॅक आणि सामाजिक भीतीसारख्या समस्या कमी करण्यासाठी. -
एकाग्रता वाढते
ध्यान केल्याने लक्ष केंद्रित करणे सोपे होते. हार्वर्डच्या अभ्यासात दिसून आले आहे की, फक्त आठ आठवडे नियमित ध्यान केल्यावर स्मरणशक्ती आणि एकाग्रता दोन्ही वाढतात; अगदी तणावाखाली असतानाही. -
ताण कमी होतो
ध्यानामुळे मन शांत होते आणि तणाव कमी होतो. शरीरात ताण निर्माण करणारे संप्रेरक (कॉर्टिसोल) कमी होतात. त्यामुळे नियमित ध्यान केल्यास दीर्घकालीन तणावावर नियंत्रण ठेवता येते. -
झोप सुधारते
झोप नीट लागत नसेल, तर ध्यान करण्याची साधना खूप उपयोगी ठरते. त्यामुळे मन शांत होते आणि शरीराला विश्रांतीचा इशारा मिळतो. त्यामुळे झोप पटकन लागून चांगल्या झोपेचा अनुभव मिळतो.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया