-
फैजल खान हे सध्या भारतातील सर्वांत लोकप्रिय शिक्षकांपैकी एक आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या खास शैली आणि दिलखुलास स्वभावामुळे त्यांचं प्रचंड कौतुक केलं जातं. (छायाचित्र: खान ग्लोबल स्टडीज/एक्स)
-
त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये केवळ विद्यार्थीच नाहीत, तर अनेक लोक त्यांच्या प्रेरणादायी बोलण्यांचेही चाहते आहेत. शिकविताना ते अशा अनेक गोष्टी सांगतात, ज्या प्रत्येकाने लक्षात ठेवायला हव्यात. (छायाचित्र: खान ग्लोबल स्टडीज/एक्स)
-
गुरुपौर्णिमेच्या खास दिवशी, चला जाणून घेऊ खान सरांनी सांगितलेल्या अशा १० महत्त्वाच्या गोष्टी, ज्या प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या आयुष्यात जरूर अमलात आणायला हव्यात. (छायाचित्र: खान ग्लोबल स्टडीज/एक्स)
-
१. “तू फक्त एक मुलगा आहेस” म्हणून कोणी तुझ्या भावना, दुःख किंवा संघर्ष विचारणार नाही. लोक फक्त हेच पाहतील– ‘तू किती कमावतोस?’ म्हणून स्वतःला इतकं मजबूत बनव, की तुझं अस्तित्वच उत्तर ठरेल. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
२. इतकं सामर्थ्यवान बना की जेव्हा तुम्ही शांतपणे कुठे बसलात, तेव्हा लोक ‘का बसलात’ यावर नाही, तर ‘तुम्ही काय मिळवलंय’ यावर चर्चा करतील. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
३. जगायचंय अशा पातळीवर, की जेव्हा पालकांना एखादी वस्तू आवडते, तेव्हा किंमत न बघता ती थेट घेऊन देता आली पाहिजे. हेच खरं यश आहे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
४. यश मिळाल्यावरही नेहमी जमिनीवर पाय ठेवून राहा. तुमचं साधेपण इतकं खोल असावं की, कोणीतरी तुमचं रूप ओळखल्यावर तो थक्क व्हावा. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
५. इतकं यशस्वी व्हा की, लोक तुम्हाला थांबवण्यासाठी टीका नाही, तर कट रचतील. तुमचं यश त्यांना अस्वस्थ करायला लागलं पाहिजे. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
६. आमचं धाडस कधीच मोजता येणार नाही. आम्ही ते पक्षी आहोत, जे पिंजऱ्यात असतानाही उडण्याची हिंमत ठेवतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
७. खरे आपले कोण आहेत हे कळण्यासाठी अनेक वेळा खूप लांब जावं लागतं. म्हणूनच प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. कधी कधी स्वतःचे दातही आपल्या जिभेला चावतात. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
८. प्रत्येक माणूस चुका करतो. त्या स्वीकारा, शिका व पुढे जा; पण सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही माणूस आहात; डिटर्जंट नाही! (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
९. नेहमी जिंकणारा नव्हे, तर हरलेलं युद्ध जिंकणारा खरा योद्धा असतो. परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी कर्णासारखा संघर्ष करा. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
१०. स्वतःला कधीही इतकं स्वस्त ठरवू नका की, कुणीही नालायक व्यक्ती तुमच्यावर खेळू शकेल. तुमचं वागणं हे समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेनुसार ठरवा. (छायाचित्र: पेक्सेल्स)

कपिल शर्माच्या कॅनडामधील नवीन कॅफेवर गोळीबार, ‘या’ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी; व्हिडीओही आला समोर